पाकिस्तानी अभिनेत्याने पंडीतासारखी म्हटली संस्कृत वंदना, ऐकून सारेच थक्क, VIDEO

Last Updated:

pakistani actor sanskrit shlok : सरस्वती वंदना बोलणाऱ्या पाकिस्तानी अभिनेत्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. तुम्ही पाहिला का?

पाकिस्तानी अभिनेत्याने म्हटली सरस्वती वंदना
पाकिस्तानी अभिनेत्याने म्हटली सरस्वती वंदना
मुंबई : विद्येची देवता म्हणजे सरस्वती जिच्यावर अनेक काव्य, रचना, स्तुती, वंदना रचण्यात आल्या आहेत. त्यातील या कुंदेंदु तुषार हार धवला... ही सरस्वती वंदना प्रत्येकाने शाळेत शिकली असेल. अनेक शास्त्रीय गायक आणि नर्तक ही वंदना तालबद्ध आणि स्वरबद्ध केली आहे. या सरस्वती वंदनेला हिंदू धर्मात अत्यंत महत्त्व आहे. सरस्वती वंदना बोलणाऱ्या एका अभिनेत्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
पाकिस्तानी लॉलीवूड तसेच बॉलीवूड आणि हॉलिवूडमध्ये आपले अभिनय कौशल्य दाखविणाऱ्या अली खानने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत संस्कृत बोलण्याच्या क्षमतेने सर्वांना आश्चर्यचकित केले. अलीने संस्कृतमध्ये देवी सरस्वतीची वंदना सादर केली.
advertisement
मुलाखतीदरम्यान अली खानने सांगितले की, तो उर्दू, हिंदी आणि संस्कृतमध्येही बोलू शकतो. अलीने मुलाखतीत एका संस्कृत वंदनेचं पठण केली.  सरस्वतीची स्तुती सादर करताच उपस्थितांनी टाळ्यांच्या कडकडाटात त्यांचं कौतुक केलं. वंदनेचे शेवटचे शब्द तो किंचित विसरला असला, तरी त्याची संस्कृतची समज आणि उच्चार पाहून सर्वांनाच आश्चर्य वाटले.
https://youtube.com/shorts/MYvIcOqvulE?si=laBT9vARjOnwIk07

बॉलिवूड आणि हॉलिवूडमध्येही काम केले आहे

advertisement
अली खानने केवळ पाकिस्तानातच नाही तर बॉलिवूड आणि हॉलिवूडमध्येही आपले अभिनय कौशल्य दाखवले आहे. त्याने काजोलसोबत 'द ट्रायल' या वेब सीरिजमध्ये काम केलं होतं. ज्यामध्ये एक किसिंग सीनही होता. याशिवाय त्याने 'लक बाय चान्स', 'डॉन 2', 'द आर्चीज' यांसारख्या बॉलिवूड चित्रपटांमध्येही काम केलं आहे.

भारतीय टीव्ही आणि ओटीटीवरही काम केले

advertisement
अली खानने 'देख भाई देख', 'बनेगी अपनी बात', 'ये है राज' आणि 'धूप की दीवार' सारख्या ओटीटी मालिका यांसारख्या भारतीय टीव्ही शोमध्येही आपले अभिनय कौशल्य दाखवले आहे. भारतीय प्रेक्षकांमध्येही त्याने स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली असून, सोशल मीडियावरही युजर्सकडून त्याची प्रशंसा होत आहे.
वापरकर्त्यांची प्रतिक्रिया अली खानच्या संस्कृत बोलण्याच्या क्षमतेने सोशल मीडियावर लक्ष वेधले. एका यूजरने लिहिले की, "देशातील लोक संस्कृत विसरत आहेत, परदेशातील लोक ते बोलत आहेत."
view comments
मराठी बातम्या/मनोरंजन/
पाकिस्तानी अभिनेत्याने पंडीतासारखी म्हटली संस्कृत वंदना, ऐकून सारेच थक्क, VIDEO
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement