Tattoo काढण्याआधी कधी सुई तपासली का? 4 गोष्टी असतात महत्त्वाच्या! नाहीतर...
- Published by:Chetan Bodke
- local18
- Reported by:Kunal Santosh Dandgaval
Last Updated:
सगळीकडेच टॅटू बनवण्याचा क्रेझ आहे. त्यामुळे मार्केटमध्ये अनेक टॅटू आर्टिस्ट आहेत. अनेक ठिकाणी रस्त्यावरही कमी पैशात टॅटू काढून मिळत असतात. परंतु तुम्हाला हे ठाऊक आहे का? आपण काढत असलेल्या टॅटू हा आपल्यासाठी काही वेळेस हानिकारक ठरू शकतो.
सगळीकडेच टॅटू बनविण्याचा मोठा क्रेझ सुरू आहे. त्यामुळे मार्केटमध्ये अनेक टॅटू आर्टिस्ट देखील उपलब्ध झाले आहेत. तर अनेक ठिकाणी रस्त्यावर देखील अगदी कमी पैशात टॅटू काढून मिळत असतात. परंतु तुम्हाला हे ठाऊक आहे का? आपण काढत असलेल्या टॅटू हा आपल्यासाठी काही वेळेस हानिकारक ठरू शकतो. टॅटू काढताना कोणती काळजी घ्यावी? हे तुम्हाला ठाऊक आहे का? टॅटू काढताना काय काळजी घ्यावी, हे ठाऊक असणं गरजेचे आहे. टॅटू काढताना कोणत्या गोष्टींवर आपण लक्ष देणे गरजेचे आहे. हे आज आपण नाशिक येथील प्रोफेशनल टॅटू आर्टिस्टकडून जाणून घेणार आहोत.
आपण आपल्या शरीरावर नेहमीसाठी काहीतरी निशाणी गोंधणारा आहोत. ती आपली आठवण असणार आहे, तर कोणासाठी एक भावनाचा विषय आहे. परंतु हे सर्व करताना तुम्ही स्वत:च्या शरीराबद्दल देखील विचार करणे गरजेचे आहे. कारण टॅटू हा प्रकार आपल्या शरीरात प्रवेश करत असतो. टॅटूसाठी लागणाऱ्या वस्तू जसेकी सुई आणि शाई हे अनेक वेळेस आपल्यासाठी हानीकार देखील ठरू शकणार असतात. ते कसे? याबद्दल अधिकची माहिती नाशिक येथील टॅटू आर्टिस्ट रवी चव्हाण यांनी 'लोकल 18' ला दिलेल्या मुलाखतीत सांगितले आहे.
advertisement
टॅटू काढत असताना आपण सर्वात प्रथम ज्याकडे आपल्या शरीरावर टॅटू काढत आहोत, त्याच्याबद्दल माहिती घेणे गरजेचे आहे. जो कोणी आर्टिट्स असेल तो या गोष्टींचा जाणकार आहे का? त्याला किंवा तिला याबद्दल अधिक माहिती आहे का? हे बघणे सर्वात महत्त्वाचे आहे. कारण आता आपण पाहतो रस्त्यावर किंवा कोणत्याही जत्रेत आपल्याला टॅटू काढणारे मोठ्या प्रमाणात बघायला मिळत असतात. परंतु त्यांच्याकडे अधिक माहिती नसल्याने आपल्यालाच याचा परिणाम भोगावा लागतो. त्यामुळे तुम्ही कोणत्याही जत्रेत किंवा रस्त्यावर टॅटू काढण्यापेक्षा प्रोफेशनल व्यक्तीकडेच टॅटू काढावा.
advertisement
टॅटू काढताना कोणती काळजी घ्यावी?
- सर्वात पहिले टॅटू काढताना टॅटू आर्टिस्टकडून आपल्या त्वचेच्या रंगाबद्दल बोलून घ्यावे. त्यानंतर टॅटू काढणारा आर्टिस्ट व्यवस्थित आणि स्वच्छ असणे गरजेचे आहे.
- टॅटू काढण्यापूर्वी आपल्या शरीराचीही स्वच्छता देखील तितकीच महत्त्वाची आहे. आपण टॅटू काढतो आहोत ती जागा देखील स्वच्छ असणे गरजेचे आहे. जेणे करून आपल्याला टॅटू साठी लागणारे साहित्य हे स्वच्छ ठेऊ शकतो.
- टॅटू काढण्यापूर्वी टॅटू आर्टिस्ट आपल्याला फक्त लागणारी सुई दाखवत असतो. परंतु महत्त्वाचे हे आहे की ज्या ठिकाणी आपण टॅटू काढत आहोत तो परिसर, बेंच देखील नीट रॅपिंग केलला हवा. आपण या गोष्टी कधी बघतच नाही. तसेच सुई ही चांगल्या गुणवत्तेची असणे गरचेचे आहे. चायना निडल नसावी हे देखील पाहणे गरजेचे आहे.
- तसेच टॅटू साठी लागणारी शाई देखील गरजेची आहे. आपल्याला कोणते इन्फेक्शन असले तर ते आर्टिस्टला सर्वात प्रथम सांगणे गरजेचे आहे. या छोट्या छोट्या गोष्टी लक्षात ठेवणे गरजेचे आहेत.
advertisement
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
November 03, 2025 7:43 PM IST

