'मी जगेन की नाही याची खात्री नव्हती', 'रात्रीस खेळ चाले' फेम अभिनेत्रीसोबत घडलेला भयंकर अपघात, पालकांनी सोडलेली आशा
- Published by:Pratiksha Pednekar
Last Updated:
Marathi Serial Actress : 'रात्रीस खेळ चाले' फेम अभिनेत्रीने एका मुलाखतीत तिच्या आयुष्यातील संघर्ष आणि मालिका विश्वात तिला मिळालेली वागणूक याबद्दल अगदी मोकळेपणाने सांगितले.
मराठी मालिका </a>विश्वात महाराष्ट्रातील वेगवेगळ्या भागातील संस्कृतींवर आधारित विषय हाताळले जातात. अशातच काही वर्षांपूर्वी अशी एक मालिका आली, ज्यातून कोकणातील मालवणी भाषेतून एक आगळी वेगळी हॉरर कहाणी सर्वांसमोर आली." width="750" height="563" /> मुंबई: मराठी मालिका विश्वात महाराष्ट्रातील वेगवेगळ्या भागातील संस्कृतींवर आधारित विषय हाताळले जातात. अशातच काही वर्षांपूर्वी अशी एक मालिका आली, ज्यातून कोकणातील मालवणी भाषेतून एक आगळी वेगळी हॉरर कहाणी सर्वांसमोर आली.
advertisement
advertisement
झी मराठी वाहिनीवर प्रसारित होणारी रात्रीस खेळ चाले ही मालिका त्या काळात तुफान गाजली. महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातील प्रेक्षकांना तिने अक्षरशः वेड लावलं. इतकंच नाही, तर या मालिकेने मराठी मनोरंजन विश्वाला नवे चेहरेही दिले. मालिकेतील प्रत्येक पात्राने प्रेक्षकांना खिळवून ठेवलं, प्रेक्षकांनीही त्यांना भरभरून प्रेम दिलं.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
इंडस्ट्रीतील तिच्या प्रवासाबद्दल बोलताना अश्विनीने एका कटू आठवणीही सांगितल्या. 'रात्रीस खेळ चाले' ही तिची पहिली मालिका होती. ती म्हणाली, "एक-दोन मोठी नावं आहेत, त्यांनी मला स्पष्ट सांगितलं होतं की, 'ही काही अभिनेत्री होणार नाही. तिनं दिग्दर्शन करावं किंवा दुसरं काहीतरी करावं.' पण मला आतून माहीत होतं, मी अभिनेत्री आहे आणि मी अभिनेत्रीच होणार. मी बॉडी शेमिंगही सहन केलं आहे."
advertisement
advertisement
ऑडिशनबद्दल बोलताना ती म्हणाली, "एका ओळखीमुळे मला ३० डिसेंबरला ऑडिशनला बोलावले. पण त्या दिवशी माझ्या नाटकाची तालीम असल्याने मी नकार दिला. नंतर २७ जानेवारीला मला संतोष अयाचितचा फोन आला. त्याने सांगितले की, 'मी तुझा फोटो चॅनलला दाखवला आणि त्यांनी तुला सिलेक्ट केलंय. फक्त थोडं कोकणी बोलावं लागेल आणि ३ महिने कोकणात राहावे लागेल.' मी दुसऱ्या दिवशी लगेच होकार कळवला."


