VIDEO : आधी भावनांवर कंट्रोल, मग स्मृतीच्या खांद्यावर डोकं ठेवून प्रशिक्षक ढसा ढसा रडला, मैदानातला भावूक करणारा क्षण
- Published by:Prashant Gomane
Last Updated:
महिला संघाचे प्रशिक्षक अमोल मजुमदार यांना देखील आपल्या भावनांवर आवर घालता आला नाही आणि ते देखील स्मृती मानधनाच्या खांद्यावर डोंक ठेवून ढसाढसा रडले आहेत.
India defeat South Africa in Final : नवी मुंबईच्या डीवाय पाटील स्टेडिअमवर भारताच्या महिला क्रिकेटरने इतिहास रचला आहे. कारण हरमनप्रीतच्या नेतृत्वाखाली भारताने वुमेन्स वर्ल्ड कप जिंकला आहे. भारत याआधी तिनदा वर्ल्ड कप फायनल पर्यंत पोहोचला होता. पण दोन वेळेस त्यांना अपयश आले होते. पण आता तिसऱ्या प्रयत्नात भारताला पहिल्यांदाच वर्ल्ड कपवर नाव कोरण्यात यश आलं. त्यामुळे महिला खेळाडूंसाठी ही खुप मोठी गोष्ट होती.या विजयानंतर सर्वंच खेळाडूंच्या डोळ्यात अश्रू होते. महिला संघाचे प्रशिक्षक अमोल मजुमदार यांना देखील आपल्या भावनांवर आवर घालता आला नाही आणि ते देखील स्मृती मानधनाच्या खांद्यावर डोंक ठेवून ढसाढसा रडले आहेत. या संदर्भातला व्हिडिओ देखील समोर आला आहे.
बीबीसीआयने हा व्हिडिओ शेअर केला आहे.या व्हिडिओत भारताने कशाप्रकारे विजयानंतर सेलीब्रेशन केलं होतं. याचा संपूर्ण क्षण या व्हिडिओत कैद झाला होता.सुरूवातीला महिला खेळाडू मैदानाच्या दिशेने धावतात.त्यानंतर सपोर्ट स्टाफ सेलीब्रेशन करताना दिसत आहेत. यानंतर भारतीय महिला खेळाडू मैदानात जल्लोष करतात.या दरम्यान खेळाडूंची सपोर्ट स्टाफ सोबत गळाभेट देखील होते. अमोल मुजुमदार एका एका खेळाडूची गळाभेट घेतात. या दरम्यान त्यांच्या डोळ्यात अश्रू होते. पण स्मृती मानधना येताच ते तिची गळाभेट घेतात आणि नंतर तिच्या खांद्यावर डोंक ठेवून रडतात. या दरम्यान स्मृती त्यांना धीर देताना दिसते. दरम्यान ज्यावेळेस ते खांद्यावरून डोकं वर करतात,त्यावेळेस ते रडताना आपला चेहरा लपवतानाही दिसले आहेत.
advertisement
📽️ Raw Reactions
Pure Emotions ❤️
The moment when #WomenInBlue created history by winning the #CWC25 Final 🥳#TeamIndia pic.twitter.com/5jV4xaeilD
— BCCI Women (@BCCIWomen) November 3, 2025
स्मृती मानधना, हरमनप्रीत कौरच्या ही डोळ्यात अश्रू होते. दरम्यान मैदानात एकीकडे भारतीय खेळाडू जल्लोष करत होता तर दुसरीकडे साऊथ आफ्रिकेचे खेळाडू निराश होऊन एका बाजूला बसले होते आणि रडत देखील होते. भारतीय खेळाडूंनी हा गोष्ट पाहून साऊथ आफ्रिकेच्या खेळाडूंना देखील धीर दिला. भारताची जेमीमा रॉड्रीक्स आणि राधा यादवने यावेळी साऊथ आफ्रिकेची मेरीजन कापची गळाभेट घेऊन तिला धीर दिला होता. या दरम्यान कर्णधार हरमनप्रीत कौर आणि साऊथ आफ्रिकेची कर्णधार व्होवार्ल्ड यांच्यात देखील गळाभेट आणि चर्चा झाली.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
November 03, 2025 7:28 PM IST
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
VIDEO : आधी भावनांवर कंट्रोल, मग स्मृतीच्या खांद्यावर डोकं ठेवून प्रशिक्षक ढसा ढसा रडला, मैदानातला भावूक करणारा क्षण


