'मन धावतंया' गाणाऱ्या राधिका भिडेसारखीच सगळ्यांना मराठीच्या प्रेमात पाडणारी; ती नऊवारी गर्ल, आठवतेय का?

Last Updated:

Radhika Bhide Mann Dhavataya : राधिका भिडे कोकणकन्या जिने आपल्या गोड आवाजात मराठी गाणं गाऊन सगळ्यांना मराठीच्या प्रेमात पाडलं आहे. याआधीही अशाच एक रिअॅलिटी शोमध्ये एका मराठी मुलीने मराठीची जादू दाखवली होती. ती तुम्हाला आठवतेय का?

News18
News18
सध्या सोशल मीडिया उघडलं की मन धावतंया... गाणं ऐकू येईल. नऊवारी साडी, नाकात नथ आणि डोक्यावर चंद्रकोर लावून एका हिंदी रिअॅलिटी शोमध्ये गाणारी राधिका भिडे. जिची सध्या सगळीकडेच चर्चा आहे. राधिका भिडे कोकणकन्या जिने आपल्या गोड आवाजात हिंदी शोमध्ये मराठी गाणं गाऊन सगळ्यांना मराठीच्या प्रेमात पाडलं आहे. याआधीही अशाच एक हिंदी रिअॅलिटी शोमध्ये एका मराठी मुलीने मराठीची जादू दाखवली होती. ती तुम्हाला आठवतेय का?
राधिका भिडेसारखीच सगळ्यांना मराठीच्या प्रेमात पाडणारी आर्या जाधव. जी रॅपर गर्ल म्हणून ओळखली जाते.आर्या ही अमरावतीची असून कोरोना काळात तिने  रॅप लिहायला सुरुवात केली. तिनं घराच्या छतावर जाऊन स्वत:चे काही रॅप व्हिडीओ रेकॉर्ड केले आणि ते युट्यूबवर अपलोड केले. त्यानंतर त्या व्हिडीओवरून तिला हंसल 2 या शोची ऑफर मिळाली. तब्बल 11 हजार स्पर्धकांमधून आर्याची निवड झाली. हंसलच्या मंचावर जाऊन आर्यानं सर्वांची मनं जिंकली. नऊवारी साडी, कपाळावर चंद्रकोर लावून नॅशनल टेलिव्हिजनवर आर्याचे रॅप फेमस झाले. शेवटच्या फेरीपर्यंत पोहोचून आर्या आऊट झाली.
advertisement
रॅपची राणी अशी आर्या जाधवची ओळख आहे.  शब्दांवरची तिची पकड तिच्या प्रत्येक रॅपमध्ये दिसून येते. आर्याचा स्वत:चा क्यूके नावाचा बँड आहे. युट्यूबरवर ती अनेक व्हिडीओ आणि रॅप शेअर करत असते. तरुणांमध्ये आर्या विशेष प्रसिद्ध आहे.
advertisement
आर्या प्रचंड रोखठोक असून तिचा हा रोकठोकपणा बिग बॉसमध्येही पाहायला मिळाला. ‘बिग बॉस मराठी 5 मध्ये सहभागी होण्याची संधी तिला मिळाली आणि तिनं प्रेक्षकांच्या मनात घर केलं.
advertisement
राधिका भिडे कोण आहे?
'आय पॉपस्टार' या कार्यक्रमात चर्चेचा विषय ठरली मराठमोळी गायिका आणि कोकणकन्या राधिका भिडेची. तिचं 'मन धावतया' हे गाणं संगीतप्रेमींच्या पसंतीला पडत आहे. राधिका भिडेची मोठी बहिण शमिका भिडेही गायिका आहे.
advertisement
राधिका भिडे ही मुंबईतील एक लोकप्रिय संगीतकार, गायिका, गीतकार, पियानिस्ट, कीबोर्डिस्ट, संगीत दिग्दर्शक आणि प्रोड्युसर आहे. राधिकाने के. एम. म्युझिक कन्सर्व्हेटरी, रॉक स्कूल लंडन आणि इनर व्हॉइस स्टुडिओज इथं शिक्षण घेतले. ती मराठी आणि इंग्रजी संगीत क्षेत्रात सक्रिय आहे. तिच्याकडे संगीत क्षेत्रात सहा वर्षांचा अनुभव आहे.  तिने हिंदी सीरिज 'ताजा खबर 2', 'दे धक्का 2', 'हर हर महादेव' या मराठी सिनेमांसाठी बॅकग्राऊंड स्कोरिंग आणि व्होकल प्रॉडक्शनचं काम पाहिलं आहे. याशिवाय तिनं काही गुजराती गाण्यांसाठी बॅकग्राऊंड स्कोरिंगचं काम केलं आहे.  पण तिची पहिली ओळख 'आय-पॉपस्टार' शोमध्ये 'मन धावतया'सारख्या मराठी गाण्यांमधून झाली. तिच्या संगीतात पारंपरिक मराठी स्वाद आणि आधुनिक पॉपचा मेळ आहे.
advertisement
आय-पॉपस्टार हा ओटीटीवरी एक नवीन भारतीय संगीत रिअॅलिटी शो आहे, ज्यात तरुण गायक-कलाकार आपली प्रतिभा दाखवतात. या कार्यक्रमात देशातील विविध भागांमधून निवडलेल्या स्पर्धकांना स्वतः गाणी लिहून, त्याला संगीत देऊन ती परीक्षकांसमोर सादर करायची आहेत. हा शो वॉर्नर म्युझिक इंडियाने लाँच केला असून, जजेसमध्ये किंग (किंग रोहन), परमिश वर्मा, आस्था गिल आणि आदित्य रिखारी यांचा समावेश आहे.
advertisement
राधिका ही आय-पॉपस्टार सीझन 1 ची एक प्रतिस्पर्धी आहे. तिने दुसऱ्या एपिसोडमध्ये मन धावतया हे मराठी गाणं गात जजेस आणि प्रेक्षकांचे मन जिंकले. तिच्या मराठी जादूने शोला खास टच दिला, आणि ती शोची सुरुवातीपासूनच स्टार ठरली आहे.   तिच्या आवाजाने किंगलाही भावुक केलं.  या गाण्यामुळे तिला इतकी प्रसिद्धी मिळाली की तिने तिचे इन्स्टाग्रामवरील 19 हजार फॉलोअर्स 86 हजारांच्या वर गेल्याचं सांगितलं.
view comments
मराठी बातम्या/Viral/
'मन धावतंया' गाणाऱ्या राधिका भिडेसारखीच सगळ्यांना मराठीच्या प्रेमात पाडणारी; ती नऊवारी गर्ल, आठवतेय का?
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement