Video : फक्त 10 रुपयांची आयडिया, बेंगलुरूच्या 3 चिमुकल्यांची कमाल; इंग्रजीत प्रोडक्ट पिच करताच पाहून हर्ष गोयनका झाले फॅन
- Published by:Devika Shinde
Last Updated:
या तीन मुलांनी आपल्या स्वत:चा बिझनेस सुरु केला आहे. त्यासाठी त्यांनी नाव ठरवलं आहे आणि विजिटिंग कार्ड देखील तयार केलं आहे. शिवाय त्यांचं प्रोडक्ट विकण्यासाठी त्यांच्याकडे चांगला प्लान आहे.
मुंबई : आजच्या काळात मुलं फक्त शिक्षणापुरती मर्यादित नाहीत, तर त्यांची कल्पनाशक्ती आणि विचार करण्याची क्षमचा कधीकधी मोठ्यांनाही आश्चर्यचकीत करुन सोडते. अरे बापरे असं पण होतं का किंवा होऊ शकतं का असा प्रश्न आपल्याला पडतो.कधीकधी तर ही मुलं अशी काही युक्ती घेऊन येतात, ते ऐकून असा प्रश्न पडतो की अरे हे आपल्याला आधी का नाही सुचलं? असंच काहीसं बंगळूरुच्या तीन लहान मुलांना पाहून वाटेल. या मुलांचा व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.
या तीन मुलांनी आपल्या स्वत:चा बिझनेस सुरु केला आहे. त्यासाठी त्यांनी नाव ठरवलं आहे आणि विजिटिंग कार्ड देखील तयार केलं आहे. शिवाय त्यांचं प्रोडक्ट विकण्यासाठी त्यांच्याकडे चांगला प्लान आहे. शिवाय हा प्रोडक्ट कुठे आणि कसा मिळणार याबद्दल देखील त्यांना सगळं ठरवलं आणि हेच सगळं या व्हिडीओमध्ये पाहायला मिळत आहे.
सोशल मीडियावर सध्या बेंगलुरूतील तीन छोट्या मुलांचा एक व्हिडिओ जोरदार व्हायरल झाला आहे. या मुलांनी आपल्या “इकोवाला (Eco Wala)” नावाच्या स्टार्टअप सुरु केलं आहे. सादरीकरण अशा भन्नाट पद्धतीने केलं की मोठमोठे उद्योगपतीसुद्धा त्यांची प्रशंसा करत आहेत.
advertisement
हा व्हिडिओ स्वतः आरपीजी एंटरप्रायझेस (RPG Enterprises) चे चेअरमन हर्ष गोयनका (Harsh Goenka) यांनी त्यांच्या ‘X’ (पूर्वी ट्विटर) अकाउंटवर शेअर केला. या व्हिडिओमध्ये या लहान उद्योजकांनी सांगितलं की ते ग्लू आणि कात्रीशिवाय पूर्णपणे इको-फ्रेंडली पेपर बॅग्स (Eco-friendly paper bags) तयार करतात. त्यांचा ₹10 महिन्याचं सब्सक्रिप्शन मॉडेल (₹10 Monthly Subscription Model) आहे, ज्यात ग्राहकांना दर आठवड्याला नवीन बॅग्स मिळतात.
advertisement
मुलांनी सांगितलं की त्यांचा उद्देश प्लास्टिकचा वापर कमी करणे हा आहे. ते म्हणाले, “आम्हाला हवं आहे की लोक प्लास्टिक बॅग्सऐवजी आमच्या हाताने बनवलेल्या इको-फ्रेंडली बॅग्स वापराव्यात.” या स्टार्टअपची खासियत म्हणजे तो झिरो-वेस्ट कॉन्सेप्ट (Zero-waste concept) वर आधारित आहे म्हणजे न गम, न कात्री, न प्लास्टिक फक्त हाताने बनवलेल्या मजबूत आणि पुनर्वापर करता येणाऱ्या पेपर बॅग्स.
advertisement
Forget Shark Tank, forget Ideabaaz, this pitch stole my heart…. pic.twitter.com/nABlEU4vU2
— Harsh Goenka (@hvgoenka) November 1, 2025
हर्ष गोयनका म्हणाले "ही पिच मनाला भिडली"
हा व्हिडिओ शेअर करताना हर्ष गोयनका यांनी लिहिलं “शार्क टँक विसरा, आयडियाबाज विसरा, या पिचने माझं मन जिंकलं.” त्यांनी या मुलांच्या आत्मविश्वासाची आणि नाविन्यपूर्ण विचारांची प्रशंसा केली. त्यांचं म्हणणं होतं की असे आयडियाज भारताच्या भविष्यासाठी आशेचा किरण आहेत. त्यांच्या या पोस्टनंतर हजारो लोकांनी हा व्हिडिओ लाईक, शेअर आणि कमेंट्स केले. अनेक यूजर्सनी म्हटलं की या मुलांचा आत्मविश्वास व्यावसायिक उद्योजकांपेक्षा कमी नाही.
advertisement
“इकोवाला” ची पिच हे दाखवते की बिझनेसच्या दुनियेत वय नव्हे, तर विचार महत्त्वाचा असतो. या तीन मुलांनी सिद्ध केलं की जर विचार स्वच्छ आणि उद्देश ठाम असेल, तर छोटा आयडिया सुद्धा मोठा बदल घडवू शकतो. आज संपूर्ण जग सस्टेनेबिलिटी (Sustainability) ची चर्चा करत असताना, या मुलांचं स्टार्टअप भारतासाठी एक मोठी प्रेरणा ठरत आहे.
advertisement
हर्ष गोयनका यांनी शेअर केलेला हा व्हिडिओ फक्त एक व्हायरल पोस्ट नाही, तर भारतातील नवीन स्टार्टअप कल्चरचं प्रतीक आहे. या मुलांनी दाखवून दिलं की भारताचं भविष्य फक्त टेक्नॉलॉजी स्टार्टअप्सचं नाही, तर इको-स्टार्टअप्स (Eco Startups) चंही आहे. ₹10 चं हे आयडिया छोटं वाटू शकतं, पण त्याचा परिणाम मात्र मोठा आहे.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
November 03, 2025 4:12 PM IST
मराठी बातम्या/मनी/
Video : फक्त 10 रुपयांची आयडिया, बेंगलुरूच्या 3 चिमुकल्यांची कमाल; इंग्रजीत प्रोडक्ट पिच करताच पाहून हर्ष गोयनका झाले फॅन


