शाहरुख खानचा KING हॉलिवूड फिल्मची कॉपी? कपडेच नाही, तर हेअरस्टाइलही सेम टू सेम, PHOTO VIRAL
- Published by:Pratiksha Pednekar
Last Updated:
Shahrukh Khan KING movie : नुकतंच शाहरुख खानच्या आगामी 'किंग' या बहुप्रतिक्षित चित्रपटाचे टायटल आणि फर्स्ट लूक जाहीर करण्यात आला. मात्र, नेटकऱ्यांनी या लूकला हॉलिवूडची चीप कॉपी म्हटलं आहे.
मुंबई : बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खानच्या ६० व्या वाढदिवसाचे औचित्य साधून त्याच्या आगामी 'किंग' या बहुप्रतिक्षित चित्रपटाचे टायटल आणि फर्स्ट लूक जाहीर करण्यात आला. पांढऱ्या केसांचा आणि हातात बंदूक घेतलेला शाहरुखचा हा 'ग्रे-हेअर' लूक पाहून चाहते एक्साइटेड झाले, पण त्यांचा हा उत्साह लगेच मावळला. कारण, अनेकांना शाहरुखचा हा लूक हॉलिवूड अभिनेता ब्रॅड पिटच्या 'F1' चित्रपटातील लूकची कॉपी वाटला.
शाहरुख खानने कॉपी केली 'F1' ची स्टाइल?
'किंग'चा पहिला लूक प्रदर्शित होताच, सोशल मीडियावर मोठी चर्चा रंगली. शाहरुखचा निळ्या शर्ट आणि टॅन जॅकेटमधील हा लूक आणि ब्रॅड पिटच्या 'F1' चित्रपटातील एका सीनचा लूक हे जवळपास सारखे दिसत असल्याचा दावा अनेकांनी केला. अनेकांनी X वर या दोन लूकचे व्हिडिओ आणि फोटो शेअर केले. काही युजर्सनी याला इन्स्पिरेशन म्हटले, तर काहींनी थेट चीप कॉपी असे टोमणे मारले.
advertisement
एका युजरने लिहिले, "किंगमध्ये शाहरुख खानला F1 मधील ब्रॅड पिटसारखे दाखवले आणि त्यांना जराही संकोच वाटला नाही." दुसऱ्याने म्हटले, "कॉस्ट्यूम डिझायनरने 'किंग'च्या सेटवर जाण्यापूर्वी फक्त F1 चित्रपट पाहिला होता आणि ते लपवण्याचा प्रयत्नही केला नाही."
I think this was intentional; a homage to Brad Pitt's #F1 look 🔥🤌#King pic.twitter.com/X7G0Ugiulu
— Shubhrayan (@outroygeous) November 2, 2025
advertisement
शाहरुखची बाजू घेत चाहत्यांनी दिले पुरावे
या टिकेमध्येच शाहरुखच्या काही चाहत्यांनी त्याला जोरदार पाठिंबा दिला. एका चाहत्याने २०१७ मध्ये आलेल्या 'जब हॅरी मेट सेजल' चित्रपटातील शाहरुखचे फोटो शेअर करत आठवण करून दिली की, हा लूक तांत्रिकदृष्ट्या पाहिल्यास सर्वात आधी शाहरुखनेच कॅरी केला होता. ट्रोल करणाऱ्यांवर पलटवार करत त्याने लिहिले, "लोक शाहरुखला ब्रॅड पिटची नक्कल केल्याबद्दल ट्रोल करत आहेत. खरंच भाई?"
advertisement

शाहरुखची क्रेझ पुन्हा एकदा काम करणार का?
'किंग' या चित्रपटाचे दिग्दर्शन सिद्धार्थ आनंद करत आहेत, ज्यांनी यापूर्वी २०२३ मध्ये रिलीज झालेल्या 'पठाण' या सुपरहिट चित्रपटात शाहरुखसोबत काम केले होते. 'किंग' मध्ये शाहरुख खानसोबत त्याची मुलगी सुहाना खान, दीपिका पादुकोण आणि अभिषेक बच्चन यांच्याही महत्त्वाच्या भूमिका असणार आहेत. आता, लूकची तुलना होत असली तरी, शाहरुखची क्रेझ प्रेक्षकांना पुन्हा एकदा थिएटरमध्ये खेचून आणणार का, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
November 03, 2025 7:02 PM IST
मराठी बातम्या/मनोरंजन/
शाहरुख खानचा KING हॉलिवूड फिल्मची कॉपी? कपडेच नाही, तर हेअरस्टाइलही सेम टू सेम, PHOTO VIRAL


