पूनम पांडे मृत नसून जिवंत असल्याचा खुलासा अखेर झाला आहे. पूनमने तिच्या या पब्लिसिटी स्टंटमागचं कारणही उघड केलं आहे. तिने तिच्या मृत्यूची खोटी बातमी का पसरवली याचा खुलासाही झाला आहे.
'रंग माझा वेगळा' नंतर 'या' भूमिकेत झळकणार रेश्मा शिंदे; नव्या मालिकेचा जबरदस्त प्रोमो रिलीज
याविषयी खुलासा करत पूनम पांडे म्हणाली, 'मला तुम्हा सर्वांना एक महत्त्वाची गोष्ट सांगायची आहे की, मी जिवंत आहे. गर्भाशयाच्या कर्करोगाने माझा जीव गेलेला नाही, पण दुःखद गोष्ट म्हणजे यामुळं हजारो महिलांनी आपले प्राण गमावले आहेत. तिने या रोगाविषयी अधिक महिलांना सतर्क करण्यासाठी हा पब्लिसिटी स्टंट केला. पण पूनमच्या या स्टंटवर नेटकरी भडकले आहेत. त्यांनी पूनमच्या या स्टंटवर संतापजनक प्रतिक्रिया दिल्या आहेत.
advertisement
पूनम पांडेने शेअर केलेल्या या व्हिडिओवर चाहत्यांनी 'हा काय मूर्खपणा आहे... इतक्या गंभीर आजाराचा तू अशा प्रकारे खिल्ली उडवलीस..हे योग्य नाही..', 'आता ही खरंच मेली तरी विश्वास नाही बसणार', 'यासाठी इतकं नाटक करायची गरज काय होती', 'यांनी लाज सोडली', 'स्वतःच्याच मृत्यूबाबत खोटी बातमी पसरवणं हे खूप लाजिरवाणं आहे' असं म्हणत नेटकऱ्यांनी तिच्यावर संताप व्यक्त केला आहे. पण पूनम जिवंत असल्यानं काही चाहत्यांना चांगलाच आनंद झाला आहे. त्यांनी कमेंट करत भावना व्यक्त केल्या आहेत.
पूनमने हा पब्लिसिटी स्टंट अनेक महिलांना त्यांच्या आरोग्याविषयी सतर्क करण्यासाठी केला होता. तिने लिहिलं आहे की, "इतर प्रकारच्या कॅन्सरप्रमाणेच, सर्व्हायकल कॅन्सर देखील पूर्णपणे टाळता येण्याजोगा आहे. लवकर या कर्करोगाचं निदान होणं आणि त्यावर HPV लस घेणं हा त्यावरचा उपाय आहे. या आजारामुळे कोणालाही आपला जीव गमवावा लागणार नाही, याची खात्री आपण केली पाहिजे. या रोगाबद्दल जागरुकता पसरवून एकमेकांना सशक्त बनवूया आणि प्रत्येक स्त्रीला यावरील उपायांबद्दल माहिती मिळेल, याची खात्री करुया. चला एकत्रितपणे रोगाच्या विनाशकारी परिणामांचा अंत करण्यासाठी प्रयत्न करूया आणि #DeathToCervicalCancer चा अवलंब करुया.'' असं तिने म्हटलं आहे.