मुंबईतल्या चाळीत राहणाऱ्या गोट्या नावाचा तरूण आणि त्याचे मित्र गँग तयार करण्याचा प्रयत्न करतात, त्यानंतर त्यांच्या आयुष्यात काय धमाल होते याची रंजक गोष्ट या सिनेमात पाहायला मिळणार आहे. राष्ट्रीय पुरस्कारप्राप्त दिग्दर्शक दिवंगत राजेश पिंजानी यांचा अखेरचा सिनेमा आहे. येच्या 26 डिसेंबरला हा सिनेमा रिलीज होणार आहे.
( कधी तोडफोड, कधी बंदी, 'धुरंधर' ते 'छावा', 2025 मध्ये वादाच्या भोवऱ्यात अडकल्या या 9 फिल्म )
advertisement
अभिनेता प्रथमेश परबसह या सिनेमात प्रवीण तरडे, डॉ. मोहन आगाशे, श्रीकांत यादव, अश्विनी गिरी, भूषण मंजुळे, विनोद वणवे, ऐश्वर्या शिंदे, मुकूंद वसुले हे कलाकारही प्रमुख भूमिकेत आहेत. मायानगरी मुंबईतील एका चाळीत राहणाऱ्या तीन मित्रांची गोष्ट गोट्या गँगस्टर या चित्रपटांतून उलगडणार आहे. आयुष्यात घडणाऱ्या काही घटनांमुळे त्या तिघांवर किडनॅपिंग करण्याची वेळ येते. सिनेमाच्या ट्रेलरमध्ये धम्माल पाहायला मिळतेय. गोट्या असं प्रथमेशच्या कॅरेक्टरचं नाव आहे. गळ्यात पन्नास तोळे सोनं घालून, हातात बंदूक, कोयते घेऊन चाळकऱ्यांना धाक दाखवताना दिसतोय.
याच दरम्यान काही वर्षांपूर्वी मुंबई सोडून थेट दुबईला पळून गेलेला डॉन चिमण भाई अचानक मुंबईत परततो. त्यानंतर विनोदी प्रसंग, भन्नाट संवाद आणि न संपणारी धमाल या सिनेमात पहायला मिळणार आहे. अत्यंत खुसखुशीत गोष्ट, उत्तम अभिनेत्यांची फौज या सिनेमात आगे. सिनेमाच्या धम्माल ट्रेलरनं सिनेमाची उत्सुकता वाढवली आहे.
'बाबू बँड बाजा' या राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त सिनेमाचं दिग्दर्शन राजेश पिंजानी यांनी केलं होतं. पहिल्याच सिनेमासाठी राष्ट्रीय पुरस्कार मिळवल्यानंतर त्यांच्याकडून आणखी उत्तमोत्तम सिनेमांची अपेक्षा होती. त्यानंतर त्यांनी दिग्दर्शित केलेला 'गोट्या गँगस्टर' सिनेमा रिलीज होण्याआधीच त्यांचं अकाली निधन झालं. गोट्या गँगस्टर हा सिनेमा 26 डिसेंबरला रिलीज करून राजेश पिंजानी यांना श्रद्धांजली वाहण्यात आली आहे.
