TRENDING:

6 वर्षांनंतर पूर्ण होणार प्रिया बापटची इच्छा, 13 वर्षांनी मोठ्या हिरोसोबत जमणार जोडी, दमदार कमबॅक!

Last Updated:

बालकलाकार म्हणून करिअरच्या सुरुवात करणाऱ्या प्रियाने तिच्या कारकिर्दीत अनेक सिनेमे, मालिका, नाटक आणि वेबसीरिजमध्ये काम केले आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
प्रिया बापट हे मराठी मनोरंजन विश्वातील आघाडीचं नाव. मात्र आता हे नाव केवळ मराठीपुरतंच मर्यादित राहिलेलं नाही. गेली कित्येक वर्ष ती या इंडस्ट्रीमध्ये कार्यरत आहे. बालकलाकार म्हणून करिअरच्या सुरुवात करणाऱ्या प्रियाने तिच्या कारकिर्दीत अनेक सिनेमे, मालिका, नाटक आणि वेबसीरिजमध्ये काम केले आहे.
“आम्ही दोघी” हा प्रियाचा प्रमुख अभिनेत्री म्हणून शेवटचा मराठी चित्रपट होता.
“आम्ही दोघी” हा प्रियाचा प्रमुख अभिनेत्री म्हणून शेवटचा मराठी चित्रपट होता.
advertisement

प्रिया बापट आता मराठीपेक्षाही हिंदी विश्वात अधिक रुळली असल्याचे काहींनी म्हटले होते. तिला पुन्हा एकदा मराठी चित्रपटात पाहण्याची तिच्या चाहत्यांची इच्छा आहे. यासंबंधी बोलताना काही दिवसांपूर्वी प्रियाने तिला मराठी चित्रपटांबाबत कोणतीही ऑफर मिळत नसल्याची खंत व्यक्त केली होती.

वयाच्या 3 ऱ्या वर्षी लैंगिक छळ, कास्टिंग काऊचची शिकार, 'दंगल गर्ल' बनण्यासाठी अभिनेत्रीने सोसला मोठा त्रास 

advertisement

“आम्ही दोघी” हा प्रियाचा प्रमुख अभिनेत्री म्हणून शेवटचा मराठी चित्रपट होता. प्रियाने एका मुलाखतीत खुलासा केला की तिला २०१८ नंतर एकाही मराठी चित्रपटासाठी विचारणा करण्यात आली नाही. मात्र आता प्रियाच्या चाहत्यांची तिला मराठी सिनेमात पाहण्याची प्रतिक्षा संपणार आहे. लवकरच तिचा मराठी सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. याबाबतची घोषणा स्वतः प्रियाने केली आहे. इतकंच नाही, तर ती या चित्रपटात पहिल्यांदाच एका मराठी अभिनेत्यासह स्क्रीन शेअर करणार आहे. कोण आहे तो अभिनेता?

advertisement

प्रियाने तिच्या इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ पोस्ट केला आहे, ज्यात ती तिच्या नव्या मराठी सिनेमाबद्दल माहिती देत आहे. तिने आपल्या कॅप्शनमध्ये म्हटलंय, "सर्वात थंड हवामानात सर्वात उबदार संघात सामील झाले! या आश्चर्यकारक क्रूचा भाग होण्यासाठी मी खूपच उत्साही आहे! मला हे खूपच खास वाटतेय! सचित बरोबरचा पहिलाच सिनेमा, आणि पुन्हा एकदा माझ्या लाडक्या मुक्ताबरोबर. खूऽऽप मज्जा येणारे. नितीन, श्रमिष्टा, तेजस, पुष्कर आमची Amzing टीम, मला सामील करून घेतल्याबद्दल धन्यवाद! *असंभव* एक अद्भुत कहाणी. १ मे २०२५ पासून जवळच्या चित्रपटगृहात."

advertisement

दरम्यान, याआधी प्रियाने “आम्ही दोघी” या चित्रपटात मुक्ता बर्वेसोबत काम केलं आहे. सचित पाटीलबरोबरचा हा तिचा पहिलाच सिनेमा आहे. गेल्या सहा वर्षांपासून एकही मराठी चित्रपटाची ऑफर न मिळाल्यामुळे निराश होणारी प्रिया तिच्या आगामी चित्रपटासाठी खूपच उत्सुक असल्याचं पाहायला मिळतंय.

मराठी बातम्या/मनोरंजन/
6 वर्षांनंतर पूर्ण होणार प्रिया बापटची इच्छा, 13 वर्षांनी मोठ्या हिरोसोबत जमणार जोडी, दमदार कमबॅक!
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल