आता अशी बातमी आली आहे की 'पुष्पा 2' अभिनेत्याला दर रविवारी चिक्कडपल्ली पोलीस ठाण्यात हजर राहण्याची गरज नाही. कोर्टाने अभिनेत्याला सूट दिली आहे. अल्लू अर्जुनच्या कायदेशीर टीमने सुरक्षेच्या कारणांचा दाखला दिल्यानंतर ही सूट देण्यात आली आहे. याशिवाय अल्लू अर्जुनला आता परदेशात जाण्याचे पूर्ण स्वातंत्र्य आहे.
'पुष्पा 2' च्या प्रीमियरदरम्यान चेंगराचेंगरीत एका महिलेचा मृत्यू झाल्याप्रकरणी अल्लू अर्जुनवर कायदेशीर कारवाई सुरू आहे. अल्लू अर्जुन थिएटरमध्ये येताच प्रीमियरच्या वेळी गर्दी नियंत्रणाबाहेर गेली. या घटनेत एका महिलेचा मृत्यू झाला असून तिचा मुलगा गंभीर जखमी झाला आहे. या मुलावर अजूनही रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
advertisement
6 वर्षांनंतर पूर्ण होणार प्रिया बापटची इच्छा, 13 वर्षांनी मोठ्या हिरोसोबत जमणार जोडी, दमदार कमबॅक!
अल्लू अर्जुनला कोर्टाकडून मोठा दिलासा मिळाला आहे. अल्लू अर्जुनच्या वकिलाने सुरक्षेच्या कारणास्तव कोर्टात अभिनेत्याला सूट देण्याची मागणी केली होती, आता कोर्टाने या अपीलवर सुनावणी केली आहे. आता अल्लू अर्जुनला रविवारी पोलिस ठाण्यात हजर राहण्याची गरज नाही. एवढेच नाही तर त्याच्या परदेश प्रवासावरील बंदीही उठवण्यात आली आहे. हा दिलासा अर्जुनसाठी एक मोठा टर्निंग पॉइंट आहे, कारण त्याने आधीच पोलिसांसमोर आपली उपस्थिती नोंदवली होती.
१३ डिसेंबर रोजी अल्लू अर्जुनला पोलिसांनी त्याच्या ज्युबली हिल्सच्या घरातून अटक केली होती. नामपल्ली न्यायालयानेही त्याला १४ दिवसांच्या कोठडीत ठेवले होते, त्यानंतर उच्च न्यायालयाने त्याला ४ आठवड्यांचा अंतरिम जामीन मंजूर केला होता. 14 डिसेंबर रोजी चंचलगुडा मध्यवर्ती कारागृहातून सुटका झाल्यानंतर, अभिनेत्याला 3 जानेवारी रोजी नामपल्ली न्यायालयातून प्रत्येकी ५०,००० रुपयांच्या दोन जामिनावर नियमित जामीन मिळाला.