ट्रेड वेबसाइट Sacknilk च्या रिपोर्टनुसार, अल्लू अर्जुनच्या 'पुष्पा 2: द रुल'ने पहिल्या आठवड्यात 725.8 कोटी रुपयांची कमाई केली आहे. दुसऱ्या आठवड्यात 264.8 कोटी रुपयांचा व्यवसाय झाला. 14 व्या दिवशीच या चित्रपटाने 1000 कोटींच्या क्लबमध्ये धमाकेदार प्रवेश केला. तिसऱ्या शुक्रवारी 'पुष्पा 2: द रुल'ने 14.3 कोटी रुपयांची कमाई केली. त्याचवेळी तिसऱ्या शनिवारी चित्रपटाच्या कमाईत मोठी झेप घेतली आहे.
advertisement
( Pushpa 2 OTT Release: अल्लू अर्जुनचा 'पुष्पा 2' OTT वर रिलीज होणार नाही? समोर आली मोठी अपडेट )
17व्या दिवशी 'पुष्पा 2: द रुल'ने 25 कोटींचा व्यवसाय केला आहे. अशा प्रकारे, चित्रपटाने आतापर्यंत देशभरात 1029.9 कोटींची कमाई केली आहे. अल्लू अर्जुनच्या चित्रपटाने हिंदी भाषेत सर्वाधिक 652.9 कोटी रुपयांचे कलेक्शन केले आहे. तेलगूमध्ये 302.35 कोटी रुपये, तामिळमध्ये 53.4 कोटी रुपये, कन्नडमध्ये 7.24 कोटी रुपये आणि मल्याळममध्ये 14.01 कोटी रुपये कमावले आहेत. ‘पुष्पा २: द रुल’ हा भारतातील सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला आहे.
चित्रपटाचा आवाज जगभर गाजला जगभरातील कलेक्शनबद्दल बोलायचे झाले तर 'पुष्पा 2: द रुल'च्या ग्रॉस कलेक्शनने 1500 कोटी रुपयांचा टप्पा ओलांडला आहे. अलीकडेच या चित्रपटाने 'जवान' आणि 'KGF 2' सारख्या चित्रपटांच्या आजीवन कलेक्शनचा विक्रम मोडला आहे. 'पुष्पा 2: द रुल' हा अल्लू अर्जुनच्या कारकिर्दीतील सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला आहे. चित्रपटाचे दिग्दर्शन सुकुमार यांनी केले असून कथाही त्यांनीच लिहिली आहे. रश्मिका मंदान्ना, फहद फाजिल आणि जगपती बाबू सारखे स्टार्स देखील या चित्रपटाचा एक भाग आहेत.