Allu Arjun: संतप्त जमावाकडून 'पुष्पा 2' फेम अल्लू अर्जुनच्या घराची तोडफोड, 8 जणांना अटक, पण कारण काय?
- Published by:Pratiksha Pednekar
Last Updated:
काही लोकांनी रविवारी तेलगू अभिनेता अल्लू अर्जुनच्या हैदराबादमधील ज्युबली हिल्सच्या निवासस्थानावर घुसून मालमत्तेचे नुकसान केले.
Allu Arjun: अल्लू अर्जुनवरील समस्यांचे सत्र संपायचे नाव घेत नाही आहे. हैदराबाद थिएटरमधील चेंगराचेंगरी प्रकरणातून त्याची सुटका होत नाही, तोच एका टोळीने त्याच्या घरात घुसून त्याच्या मालमत्तेची नासधूस केली आहे. हे लोक उस्मानिया विद्यापीठाचे सदस्य असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. पोलिसांनी हस्तक्षेप करून जेएसीच्या आठ सदस्यांना अटक केली, ज्यांना नंतर ज्युबली हिल्स पोलिस ठाण्यात नेण्यात आले.
[video mp4="https://images.news18.com/news18marathi/uploads/2024/12/WhatsApp-Video-2024-12-22-at-5.59.07-PM-2024-12-bc97ce93d1b78485679ac15a6353f689.mp4"][/video]
उस्मानिया युनिव्हर्सिटी जेएसीच्या अनेक सदस्यांचा समावेश असलेल्या या गटाने अभिनेत्याच्या घरात जबरदस्तीने प्रवेश करण्याचा प्रयत्न केला आणि 4 डिसेंबर रोजी एका सिनेमात चेंगराचेंगरी सारख्या परिस्थितीत मृत्यू झालेल्या 35 वर्षीय महिलेच्या कुटुंबाला एक कोटींची भरपाई देण्याची मागणी केली.
BREAKING: Allu Arjun house protestors DEMAND ₹1⃣ cr for Pushpa 2⃣ stampede victim family. pic.twitter.com/pJTgQDDcM2
— Manobala Vijayabalan (@ManobalaV) December 22, 2024
advertisement
काय आहे संपूर्ण प्रकरण?
पुष्पा २ ने जगभरात १००० कोटींचा गल्ला जमवला. त्याचवेळी हैदराबाद पोलिसांनी सुपरस्टार अल्लू अर्जुनला अटक केली. ‘पुष्पा 2’ च्या स्क्रीनिंग दरम्यान हैदराबादच्या संध्या थिएटरमधील चेंगराचेंगरी आणि त्यात एका महिलेचा झालेला मृत्यू या प्रकरणी अल्लू अर्जुनवर कारवाई करण्यात आली. त्याला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. मात्र त्याच दिवशी त्याला जामीनही मंजूर झाला.
advertisement
4 डिसेंबर रोजी हैदराबादच्या संध्या थिएटरमध्ये चेंगराचेंगरीची परिस्थिती असताना एका 35 वर्षीय महिलेचा मृत्यू झाला आणि तिच्या आठ वर्षांच्या मुलाला रुग्णालयात दाखल करण्यात आले. या घटनेनंतर, मृत महिलेच्या कुटुंबीयांनी दाखल केलेल्या तक्रारीच्या आधारे, अल्लूवर कलमांखाली चिक्कडपल्ली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता. या घटनेनंतर अल्लू अर्जुनवर अनेक स्तरातून टीका केली जात आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
December 22, 2024 6:10 PM IST
मराठी बातम्या/मनोरंजन/
Allu Arjun: संतप्त जमावाकडून 'पुष्पा 2' फेम अल्लू अर्जुनच्या घराची तोडफोड, 8 जणांना अटक, पण कारण काय?