न्यायालयाच्या निर्देशानुसार अल्लू अर्जुनला दोन महिन्यांच्या कालावधीसाठी किंवा आरोपपत्र दाखल होईपर्यंत दर रविवारी सकाळी 10 ते दुपारी 1 या वेळेत तपास अधिकाऱ्यांसमोर हजर राहावे लागत होते.
( मृत महिलेच्या मुलासाठी अल्लू अर्जुनचे वडील धावले, केली इतक्या कोटींची मदत )
अल्लू अर्जुन परदेशात जाऊ शकणार नाही
याशिवाय न्यायालयाने अल्लू अर्जुनला न्यायालयाला न कळवता त्याचा निवासी पत्ता बदलू नये असे निर्देश दिले आहेत. त्याचप्रमाणे परवानगीशिवाय परदेशात जाण्यासही मनाई केली. या प्रकरणाचा निर्णय होईपर्यंत या अटी लागू राहतील.
advertisement
4 डिसेंबरला नेमकं काय झालं?
4 डिसेंबर रोजी हैदराबादच्या संध्या थिएटरमध्ये 'पुष्पा 2' च्या प्रीमियरच्या वेळी अल्लू अर्जुनची एक झलक पाहण्याच्या शर्यतीत चाहत्यांमध्ये चेंगराचेंगरीसारखी परिस्थिती निर्माण झाली होती. यादरम्यान एका 35 वर्षीय महिलेचा मृत्यू झाला. तिचा 9 वर्षांचा मुलगा जखमी झाला. मुलाची प्रकृती चिंताजनक असून त्याला व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते. सुमारे 20 दिवसांनंतर त्याच्या वडिलांनी सांगितले की आता तो पूर्वीपेक्षा बरा आहे. अल्लू अर्जुनचे कुटुंब त्याला खूप मदत करत असल्याचेही सांगण्यात आले.