अभिनेता अल्लू अर्जुनने शनिवारी, 21 डिसेंबर रोजी हैदराबाद चेंगराचेंगरीप्रकरणी आपली बाजू मांडली आणि तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांनी केलेले आरोपही फेटाळून लावले. तो म्हणाले की, 4 डिसेंबर रोजी हैदराबादमधील थिएटरमध्ये 'पुष्पा 2' चित्रपटाच्या प्रीमियरदरम्यान एका महिलेचा मृत्यू झाला आणि तिचा मुलगा जखमी झाला ही घटना दुःखद आहे.
'नदियों पार सजन दा थाना', गाणं सुपरहिट, पण त्याचा अर्थ तरी काय? कधीच केला नसेल हा विचार
advertisement
रेवंत रेड्डी यांनी अभिनेत्यावर रोड शो आयोजित केल्याबद्दल आणि थिएटरमध्ये गर्दीला ओवाळण्याबद्दल टीका केली होती, त्यानंतर काही तासांनंतर अभिनेत्याने आरोपांचे खंडन केलं आणि सांगितलं की ही मिरवणूक किंवा रोड शो नाही. पत्रकार परिषदेत तो म्हणाले, 'मी एका विशिष्ट पद्धतीने वागलो, अशी चुकीची माहिती पसरवली जात आहे. हे चुकीचे आरोप आहेत. हे अपमानास्पद आणि चारित्र्यहानी आहे. खूप चुकीची माहिती पसरवली जात आहे, खूप खोटे आरोप केले जात आहेत. लोक मला 20 वर्षांपासून ओळखतात. मी असे बोलू शकतो का?
अल्लू अर्जुनने असंही सांगितले की, मला दुसऱ्या दिवशी काय झालं हे कळालं. 'माझी पत्नी आणि मुले माझ्यासोबत होती. मला माहीत असतं तर मी निघताना माझ्या मुलांना घेऊन गेलो असतो का? मी फक्त माझ्या पत्नीसोबत गेलो असतो. मी माझ्या मुलांवर प्रेम करतो. मी इतर कोणत्याही मुलाशी असं करणार नाही. मलापण एक मूल आहे, जो पीडितेच्या वयाचा आहे. मी बाप नाही का? वडिलांना कसं वाटतं हे मला समजत नाही का?'
अल्लू अर्जुनला चेंगराचेंगरीसाठी जबाबदार धरलं. महिलेच्या मृत्यूला अपघात असल्याचं सांगून अल्लू अर्जुन म्हणाला की, ही दुर्दैवी घटना असल्याने मी कोणाला दोष देत नाही. 4 डिसेंबर रोजी हैदराबादच्या संध्या थिएटरमध्ये चेंगराचेंगरीची परिस्थिती असताना एका 35 वर्षीय महिलेचा मृत्यू झाला आणि तिच्या आठ वर्षांच्या मुलाला रुग्णालयात दाखल करण्यात आले. या घटनेनंतर, मृत महिलेच्या कुटुंबीयांनी दाखल केलेल्या तक्रारीच्या आधारे, अल्लूवर कलमांखाली चिक्कडपल्ली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता.
अल्लू अर्जुन 4 आठवड्यांच्या अंतरिम जामिनावर आहे महिलेच्या मृत्यूप्रकरणी अल्लू अर्जुनला हैदराबाद पोलिसांनी 13 डिसेंबरला अटक केली होती. त्याच दिवशी तेलंगणा उच्च न्यायालयाने त्याला चार आठवड्यांचा अंतरिम जामीन मंजूर केला आणि 14 डिसेंबरच्या सकाळी त्याची तुरुंगातून सुटका झाली. सुपरस्टारने जखमी मुलाबद्दल अपडेटही दिले. ते म्हणाले, 'मला दर तासाला मुलाच्या तब्येतीचे अपडेट मिळत आहेत. तो बरा होत आहे.