'नदियों पार सजन दा थाना', गाणं सुपरहिट, पण त्याचा अर्थ तरी काय? कधीच केला नसेल हा विचार
- Published by:Pratiksha Pednekar
Last Updated:
आतापर्यंत तुम्ही हे गाणे सोशल मीडियावर आणि लग्नाच्या पार्ट्यांमध्ये नक्कीच ऐकले असेल. पण या गाण्याचा अर्थ तुम्हाला माहित आहे का?
2021 मध्ये एक चित्रपट प्रदर्शित झाला, ज्याचं नाव आहे 'रुही'. या चित्रपटातील गाण्यांना प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. या चित्रपटातील 'नदियों पार सजन दा थाना' हे गाणे तुम्ही ऐकलेच असेल. या गाण्याचे नाव 'नदियों पार' असे असून आतापर्यंत तुम्ही ते सोशल मीडियावर आणि लग्नाच्या पार्ट्यांमध्ये नक्कीच ऐकले असेल. पण या गाण्याचा अर्थ तुम्हाला माहित आहे का?
500 वर्ष जुन्या कव्वालीचा संबंध
लक्ष्य मेहेश्वरी अनेकदा त्याच्या इन्स्टाग्रामवर गाण्यांच्या अर्थाचे व्हिडिओ पोस्ट करत असतो. 'नदियों पार सजन दा थाना' या गाण्याचा अर्थ त्याने एका व्हिडिओमध्ये सांगितला. हे गाणे एक-दोन नाही तर तब्बल 500 वर्षे जुने आहे. १६ व्या शतकात शाह हुसैन यांनी एक कव्वाली लिहिली होती, ज्याचे बोल होते, 'मन अटकेया बेपरवाह दे नाल'. हे गाणे या कव्वालीशी संबंधित आहे.
advertisement
'नदियों पर सजन दा थाना' चा अर्थ काय?
1995 मध्ये नुसरत फतेह अली खान यांनी हे गाणे लोकांसमोर आणले. 'मन आटकेया बेपरवाह दे ना' म्हणजे माझे मन गुंतले आहे, तेही एका निष्काळजी माणसात. 'नदियों पर सजन दा थाना' म्हणजे ज्या व्यक्तीला भेटण्यासाठी तुम्हाला नदी ओलांडायची आहे. 500 वर्षे जुनी कव्वाली 'रुही' चित्रपटात नव्या शैलीत सादर करण्यात आली. कव्वालीमध्ये रांझन हा शब्द वापरला होता आणि या गाण्यात रांझांऐवजी सजन. त्यानंतर 'नदियों पर सजन दा थाना' हे गाणे तयार झाले.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
December 21, 2024 8:52 PM IST
मराठी बातम्या/मनोरंजन/
'नदियों पार सजन दा थाना', गाणं सुपरहिट, पण त्याचा अर्थ तरी काय? कधीच केला नसेल हा विचार