5 डिसेंबर 2024 रोजी थिएटरमध्ये आलेला हा ब्लॉकबस्टर चित्रपट आता घरबसल्या बघायला मिळणार आहे. 13 एप्रिलपासून विविध भाषांमध्ये टीव्ही प्रीमियर होणार आहे.
'पुष्पा २' कधी, कुठे बघता येईल?
तेलुगू भाषेत: 13 एप्रिल, संध्याकाळी 5:30 वाजता – Star Maa
मल्याळम भाषेत: 13 एप्रिल, संध्याकाळी 6:30 वाजता – Asianet
कन्नड भाषेत: 13 एप्रिल, संध्याकाळी 7 वाजता – Colors Kannada
advertisement
तमिळ भाषेत: 14 एप्रिल, दुपारी 3 वाजता – Star Vijay
हिंदी प्रेक्षकांना मात्र अजून थांबावं लागेल. कारण टीव्हीवर हिंदी आवृत्तीची तारीख अजून जाहीर झालेली नाही.
दरम्यान, ‘पुष्पा २: द रुल’ हा 2021 मध्ये आलेल्या ‘पुष्पा: द रायझ’चा सिक्वेल आहे. याचे दिग्दर्शन पुन्हा एकदा सुकुमार यांनीच केलंय. अल्लू अर्जुन आणि रश्मिका मंदान्ना या जोडीने पुन्हा धमाका केला. साऊथ इंडस्ट्रीत ‘पुष्पा 2’ हा सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला.