कल्याण फास्ट लोकलमध्ये अभिनेता आर माधवन चढला, असा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. आज फरहान मिल गया कल्याण फास्ट मे असं म्हणत एका इन्स्टाग्राम युझरने व्हिडीओ शेअर केला आहे. त्याचे केस डोळ्यांवर आले आहेत. त्याने खांद्याला बॅग लावली आहे आणि हातात फोन आहे.
advertisement
व्हायरल होणारा हा व्हिडीओ पाहिल्यानंतर त्यात दिसणारी ही व्यक्ती आर माधवन सारखी दिसतेय पण तो आर माधवन नाहीये. एकसारखी दिसणारी सात माणसं असतात असं म्हणत. ही व्यक्ती आर माधवनसारखी दिसतेय. त्याला पाहून चाहत्यांना थ्री इडियट्समधील आर माधवनचं फरहान हे कॅरेक्टर आठवलं. फरहानला वाईल्ड लाइफ फोटोग्राफर बनायचं असतं, पण त्याचा अब्बा त्याला परवानगी देत नाहीत. ट्रेनमधील माणसाला पाहून चाहत्यांनी फरहानला आठवून धम्माल कमेंट्स केल्या आहेत.
एका युझरने लिहिलंय, "अब्बा मान गये?" दुसऱ्याने लिहिलं, "बॅगमध्ये DSLR असेल". आणखी एकाने लिहिलंय, "चिल गाइज, कर्जत के रेन फॉरेस्टमध्ये सूट करून परत आलाय." तर आणखी एका लिहिलंय, "वाइल्ड लाइफ फोटोग्राफी सोडून इंजिनिअरींमध्ये वापसी."
आर माधवनचा 'थ्री इडियट्स' हा सिनेमा त्याच्या अभिनय कारकिर्दीतला सर्वात गाजलेला सिनेमा आहे. या व्हिडीओ दिसणारी व्यक्ती आर माधवन नसली तरी चाहत्यांना मात्र आर माधवनचं कॅरेक्टर त्यात दिसलं. फरहान या कॅरेक्टरवर प्रेक्षकांचं आजही किती प्रेम आहे हे दिसून आलं.
