उत्तर या मराठी सिनेमात राधिका भिडेचं सुंदर गाणं ऐकायला मिळणार आहे. 'हो आई' असं गाण्याचं नाव असून राधिकाचं पार्श्वगायिका म्हणून पहिलं गाणं ठरलं आहे. उत्तर या मराठी सिनेमाच्या प्रमोशनल गाण्यात आई-मुलाच्या नात्यातील सुंदर केमिस्ट्री, गोड आपुलकी आणि 'तू आहेस म्हणून मी आहे' ही भावना सोप्या शब्दात आणि गोड चालीत उलगडली आहे.
advertisement
अमितराज- क्षितिज पटवर्धन या जोडीचं हे गाणं आहे. यापूर्वी अमितराज–क्षितिज पटवर्धन ह्या जोडीने 'मन धागा धागा जोडते नवा', 'माझ्या राजा रं, माझ्या शिवबा रं' आणि 'तुला जपणार आहे' यांसारख्या सुपरहिट गाण्यांमुळे प्रेक्षकांच्या हृदयात घर केलं आहे. नात्यांचे बंध उलगडणारं, त्यांचं हळूवारपण जपणारं हे गाणं नुकतंच रिलीज करण्यात आलं आहे. आपल्या सर्वांच्याच मनातली आईबद्दलची भावना व्यक्त करणारं राधिकाच्या सुमधुर सुरांनी सजलेलं तरल आणि संवेदनशील गाणं आहे.
'उत्तर' या सिनेमातून अभिनेत्री रेणुका शहाणे पुन्हा एकदा सिनेमात दिसणार आहे. रेणुका शहाणे यांच्याबरोबर अभिनेता अभिनय बेर्डे आणि ऋता दुर्गुळे हे कलाकारही प्रमुख भूमिकेत आहेत. येत्या 12 डिसेंबरला हा सिनेमा रिलीज होणार आहे.
राधिका भिडे ही कोकणातील रत्नागिरी जिल्ह्यातील आहे. राधिकाची बहिण शमिका भिडे ही देखील प्रसिद्ध गायिका आहे. राधिका आयपॉपस्टार या ओटीटीवर लोकप्रिय शोमधून प्रसिद्धी मिळवली. राधिका ही अनेक तरुणांची क्रश झाली आहे. मन धावतंय या गाण्यानंतर तिची फॅन फॉलोविंग देखील प्रचंड वाढली आहे.
