चित्रपट पाहिल्यानंतर दिग्दर्शक राम गोपाल वर्मा यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली आहे. ऋषभ शेट्टीचं मनापासून कौतुक करत राम गोपाल वर्मा यांनी चांगल्या अर्थाने असे शब्द वापरले आहेत. राम गोपाल वर्मा यांनी लिहिलंय, "कांतारा हा अप्रतिम आहे. भारतातील सर्व फिल्ममेकरना हा चित्रपट पाहून लाज वाटली पाहिजे. ऋषभ शेट्टी आणि त्यांच्या टीमनं BGM, साउंड डिझाईन, सिनेमॅटोग्राफी, प्रॉडक्शन डिझाईन आणि VFX मध्ये कमाल केली आहे."
advertisement
ते पुढे म्हणाले, "केवळ त्यांच्या मेहनतीमुळेच ‘कांतारा: चॅप्टर 1’ ब्लॉकबस्टर ठरला आहे. तू उत्तम दिग्दर्शक आहेस की उत्तम अभिनेता, हे मी ठरवू शकत नाही."
राम गोपाल वर्मा यांचं हे ट्विट शेअर करत ऋषभ शेट्टीने त्यांचे आभार मानले. तो म्हणाला, "मी फक्त सिनेमावर प्रेम करणारा एक माणूस आहे सर. तुमच्या प्रेम आणि पाठिंब्याबद्दल मनापासून आभार."
राम गोपाल वर्मा यांनी ऋषभ शेट्टीचं हेच ट्विट पुन्हा शेअर करत लिहिलंय, "तू सिनेमा Lover नाही, तू सिनेमा FUCKER आहेस. तू आम्हा सर्व फिल्ममेकर्सना दाखवून दिलं की खरं सिनेमा कसा बनवायचा. तुझ्या ‘Kantara Chapter 1’ या महाकाव्यानं भारतीय सिनेमात एक नवा अध्याय सुरू केला आहे. तू निर्माण आणि नवकल्पना यांचा नवा प्रवाह सुरू केलास, ज्यामुळे नव्या प्रकारच्या सिनेमाचा जन्म झाला आहे. आम्हा सर्वांना या अनुभवामुळे सिनेमाविषयी प्रचंड उत्साह आणि प्रेरणा मिळाली आहे."