राणी म्हणाली, "आम्हाला कधीच असं वाटलं नाही की आमची मुलगी सतत कॅमेऱ्यांसमोर राहावी. कारण ती जेव्हा मोठी होईल, तेव्हा तिची ओळख तिच्या आई-वडिलांच्या प्रसिद्धीमुळे नव्हे, तर तिच्या स्वतःच्या मेहनतीमुळे व्हावी. आम्हाला तीला 'स्टार किड' टॅग नको आहे."
बॉलिवूडमधील सर्वात श्रीमंत स्टार किड, 3130 कोटींचा मालक; अभिनयासोबतच बिझनेसचा बादशाह
एएनआयशी बोलताना राणी पुढे म्हणाली, आदिराला प्रायव्हसी खूप महत्त्वाची आहे आणि ती हे स्वभाव तिच्या वडिलांकडून आदित्य चोप्रांकडून शिकली आहे. यामुळेच यशराज फिल्म्सचे प्रमुख असूनही आदित्य चोप्रा फारच लो-प्रोफाईल जीवन जगतात.
advertisement
राणीने तिच्या मातृत्वाच्या प्रवासाबद्दलही किस्से सांगितले. तिने उघड केलं की ती हिचकी चित्रपटाचं शूट करत होती तेव्हा आदिरा फक्त 14 महिन्यांची होती. राणी अजूनही तिला स्तनपान देत होती, त्यामुळे रोज सकाळी शूटिंगला जाण्यापूर्वी दूध काढून ठेवत असे. ती म्हणाली, “माझा पहिला शॉट सकाळी 8 वाजता सुरू होत असे. युनिटने मला इतकं सहकार्य दिलं की मी दुपारीचं शूटिंग संपवून घरी परत जाई. हा प्रवास सोपा नव्हता पण मी आई म्हणून जबाबदारी आणि काम दोन्ही सांभाळलं."
दरम्यान, राणी आणि आदित्य यांनी 2014 मध्ये इटलीमध्ये गुपचूप लग्न केलं होतं. बॉलिवूडमधील एका मोठ्या प्रोडक्शन हाऊसचे मालक असूनही आदित्य चोप्रा फारच खाजगी आहेत. राणी म्हणाली "आदित्यला कधीही आमच्या लग्नाचे फोटो सार्वजनिक करायचे नाहीयेत. त्यांना वैयक्तिक आयुष्य खूप खाजगी ठेवायला आवडतं."
आदिराचा जन्म 9 डिसेंबर 2015 रोजी झाला. आता ती 10 वर्षांची झाली आहे. मात्र इतक्या वर्षांत पापाराझींना तिची झलक क्वचितच पाहायला मिळाली असेल. इतर स्टारकिड्सप्रमाणे आदिराची चर्चा सोशल मीडियावर होत नाही, कारण तिच्या आई-वडिलांनी तिच्यावर स्पॉटलाइटचा ताण कधी येऊ दिलाच नाही.