कॉफी विथ करण हा शो प्रेक्षकांमध्ये चांगलाच फेमस आहे. या शोचा आठवा सीझन नुकताच सुरू झाला असून रणवीर आणि दीपिका शोचे पहिले होस्ट आहे. शोचा एक प्रोमो समोर आला आहे ज्यात रणवीरनं दोघांच्या सिक्रेट साखरपुड्याबद्दल खुलासा केला आहे. रणवीरनं दीपिकाबरोबरच्या डेटिंगविषयीही मनमोकळ्या गप्पा मारल्या आहेत.
हेही वाचा - लग्नाच्या पाच वर्षानंतर पाहायला मिळणार दिपवीरच्या लग्नाचा तो व्हिडीओ; चाहत्यांची उत्सुकता शिगेला
advertisement
प्रोमोमध्ये पाहायला मिळत आहे की, करण जोहर रणवीर आणि दीपिकाला त्यांच्या लग्नाबद्दल विचारतो. तेव्हा रणवीर म्हणतो, "2015मध्ये मी दीपिकाला प्रपोज केलं होतं. याच दरम्यान दोघांनी सिक्रेट साखरपुडा उरकला होता. ज्याबद्दल कोणाला माहिती नव्हतं".
रणवीर पुढे म्हणाला, "मी तिला प्रपोज केल्यानंतर मला तिला गमवायचं नव्हतं. कोणीतरी आमच्यामध्ये येण्याआधीच मला तिथे चप्पल ठेवायची होती". याचाच अर्थ रणवीरला दीपिकाला गमावण्याची भिती वाटत होती. रणवीरच्या या खुलास्यानंतर दीपिकानं हसत हसत, "हो त्याने माझं अँडवान्स बुकींग केलं होतं".
अभिनेता रणवीर सिंह त्याच्या प्रेमळ बायकोवर प्रेम करण्याची एकही संधी सोडत नाही हे वेळोवेळी पाहायला मिळत आहे. कॉफी विथ करणच्या मंचावरही दोघांचा रोमान्स पाहायला मिळणार आहे. दोघे कधी किस तर कधी हग करताना दिसणार आहे.
दरम्यान करण जोहरनं दीपिकाला "रणवीर सोडता कोणत्या अभिनेत्याबरोबर तुझी चांगली केमिस्ट्री आहे असं वाटतं?", असा प्रश्न विचारला. त्यावर उत्तर देत दीपिकानं अभिनेता ऋतिक रोशनचं नाव घेतलं. ऋतिकचं नाव ऐकून करण आणि रणवीर शॉक झाले. सांगायचं झालं तर दीपिका आणि ऋतिक रोशल यांचा फाइटर हा नवा सिनेमा प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. या सिनेमाच्या निमित्तानं दोघे पहिल्यांदा एकत्र काम करणार आहे. 25 जानेवारी 2024 रोजी हा सिनेमा रिलीज होईल.