विजय देवरकोंडा नुकताच श्री सत्य साई बाबांच्या महासमाधीवर आपल्या कुटुंबासह दिसला. साध्या कपड्यांत, चेहऱ्यावर शांत भाव आणि हातात फुलांचा गुच्छ. पण चाहत्यांचं लक्ष वेधून घेतलं ते त्याच्या अनामिका बोटातील चमकणाऱ्या अंगठीने. सर्वांनी अंदाज लावला की हीच साखरपुड्याची अंगठी असावी.
'कांतारा चॅप्टर 1' नंतर भारताला मिळाली नवी नॅशनल क्रश! कोण आहे रुक्मिणी वसंत?
advertisement
रश्मिका आणि विजयने अद्याप साखरपुड्याच्या चर्चांवर मौन सोडलेलं नाही. दरम्यान, रश्मिका मंदान्नानेही लग्नाच्या अफवांनंतर तिची पहिली सोशल मीडिया पोस्ट टाकली. पण अपेक्षेप्रमाणे ती विजयसोबतचा फोटो नव्हता. तिने ‘थामा’ चित्रपटातील BTS शेअर केलेलं. ज्यावर चाहत्यांनी मजेशीर कमेंट्स केल्या, “आता विजयसोबतचा फोटो कधी?”, “साखरपुडा झाला का?”
काही मीडिया रिपोर्ट्समध्ये दावा केला गेला आहे की, विजय देवरकोंडाच्या टीमने त्यांच्या साखरपुड्याच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. हा साखरपुडा समारंभ हैदराबाद येथे झाला असून, त्यासाठी फक्त दोन्हीकडील कुटुंबीय सदस्य आणि अगदी जवळचे मित्र उपस्थित होते. मिळालेल्या माहितीनुसार, हे कपल फेब्रुवारी 2026 मध्ये विवाहबंधनात अडकण्याची शक्यता आहे.