अभिनेत्री रवीना टंडनने काल रात्री दारूच्या नशेत असताना गाडी चालवत एका वृद्ध महिलेला धडक दिल्याचा आरोप तिच्यावर होत आहे. वांद्रे येथील रिझवी लॉ कॉलेजजवळ ही घटना घडली आहे. त्या पीडिता मुलानेच्या रविणावर, रिझवी लॉ कॉलेजजवळ रवीना टंडनच्या कारने त्याच्या आईला धडक दिली. या घटनेनंतर अभिनेत्री आणि तिच्या ड्रायव्हरने माफी मागण्याऐवजी पीडिता आणि त्याच्या कुटुंबीयांशी जोरदार वाद घातला' असा आरोप तिच्यावर केला आहे.
advertisement
समोर आलेल्या व्हिडिओमध्ये रस्त्यावर रवीनासोबत नागरिक वाद घालत आहेत आणि धक्काबुक्की करत आहेत. यासोबतच रवीनाच्या ड्रायव्हरने त्याच्या कुटुंबीयांना मारहाण केल्याचा आरोपही तो व्यक्ती करत आहे. यानंतर रवीना टंडन कारमधून बाहेर आली आणि तिने आईला मारहाण केल्याचा आरोप पीडितेने केला आहे. अभिनेत्री दारूच्या नशेत होती. तसंच या पीडितेने रविना टंडनने, तिच्या आई आणि भाचीला एवढी मारहाण करण्यात आली कीं त्यांचं डोकं फुटलं असा आरोप केला आहे. मात्र, पोलिसांच्या म्हणण्यानुसार हे सर्व आरोप बिनबुडाचे असून दोघांकडूनही तक्रार दाखल करण्यात आलेली नाही.
याविषयी माहिती देताना डीसीपी राजतिलक म्हणाले, 'लग्नाच्या कार्यक्रमानंतर एक वृद्ध महिला आपल्या घराकडे जात होती. त्याचवेळी रवीना टंडन ज्या कारमध्ये बसली होती आणि त्या महिलेच्या चुकीमुळे ती कारला धडकली. या घटनेनंतर वृद्ध महिलेला राग आला आणि तिने रवीना टंडनच्या ड्रायव्हरशी हुज्जत घालायला सुरुवात केली.'
यानंतर रविना कारमधून उतरली आणि वृद्ध महिलेसोबत जोरदार वादावादी झाली. हा व्हिडीओ पाहून रविना दारूच्या नशेत असल्याचं बोललं जातंय. हा व्हिडिओ समोर येताच नेटकऱ्यांनी रवीनाला ट्रोल करायला सुरुवात केली आहे. रवीना नशेत असल्याची टीका तिच्यावर होत आहे.मात्र या प्रकरणावर तिच्याकडून अद्याप कोणतंही वक्तव्य समोर आलेलं नाही.