'एज इज जस्ट अ नंबर', 'हमारा जवला बरकरार हें' असं म्हणायला भाग पाडणारा रेखा यांचा एक व्हिडीओ समोर आला आहे. रेखा नेहमीच बिनधास्त असतात पण यावेळी त्यांच्या कपड्यांनी त्यांच्यातील बिनधास्तपणा थोडा आणखीच जवळून पाहायला मिळाला.
( 15,000 लोकांच्या गर्दीत रेखाचा कंट्रोल सुटला, अमिताभसोबत केलं असं काही; आजही होतेय चर्चा )
advertisement
रेखा नुकत्याच अभिनेत्री हेलन यांच्या 87 व्या बर्थडे पार्टीमध्ये सहभागी झाली होती. मुंबईत झालेल्या या ग्रँड पार्टीमध्ये अनेक कलाकार मंडळी सगभागी झाली होती. हेलन यांच्या बर्थडे पार्टी रेखा खास लुकमध्ये आल्या होत्या. त्यांनी ब्लॅक कलरचा जम सूट आणि त्यावर ब्लू डेनिम जॅकेट वेअर केलं होतं. हातात झोला वाली बॅग, डोळ्यांना गॉगल आणि त्यांची नेहमीच मरून कलरची लिप्स्टिक.... रेखाच्या या लुकनं सगळ्यांचं लक्ष वेधलं.
हेलन यांच्या बर्थडे पार्टीला आलेल्या रेखा यांनी पापाराझींना फोटोसाठी पोझेस दिल्या. रेखाने फॅन्सबरोबर फोटोही क्लिक केलेत. इतकंच नाही तर पापाराझींचा कॅमेरा घेऊन रेखानं त्यांचे फोटोही काढले. रेखाचा डॅशिंग, दबंग अंदाज यावेळी पाहायला मिळाला.
रेखाचा हा डॅशिंग अंदाज पाहून एका युझरनं लिहिलंय, क्विन नेहमीच पॉझिटिव्ह असते. त्यांच्या मागे उभे असलेले गार्ड देखील त्यांना पाहून खुश आहेत. दुसऱ्यानं लिहिलंय, सुपर एनर्जेटिक. आणखी एका युझरनं लिहिलंय, तुम्हाला पाहून अमिताभ यांना जेलस होत असतील.
अभिनेत्री रेखा तब्बल 11 वर्षांनी रुपेरी पडद्यावर कमबॅक करणार आहे. 71 वर्षांच्या रेखा यांना मोठ्या पडद्यावर पाहण्यासाठी चाहते देखील उत्सुक आहेत. गुस्ताख इश्क या सिनेमात रेखा कॅमियो करणार आहेत. विजय वर्मा आणि फातिमा सना शेख हे या सिनेमात प्रमुख भूमिकेत आहेत. 28 नोव्हेंबर 2025 रोजी हा सिनेमा रिलीज होणार आहे.
