शबाना यांच्या बर्थडे पार्टीत बॉलिवूडच्या बड्या अभिनेत्रींनी एकत्र येऊन एक शानदार डान्स केला. शबाना आझमी, विद्या बालन, रेखा, माधुरी दीक्षित आणि उर्मिला मातोंडकर यांनी 'परिणीता' मधील 'कैसी पहेली जिंदगानी' या फेमस गाण्यावर धम्माल डान्स केला. रेखा आणि विद्या बालन यांनी तर सगळ्यांचं लक्ष वेधलं.
( Fitness Secreat : बॉलिवूड हिरोईनलाही फिकी करणारी ग्लॅम डॉल! 36-24-36 फिगरचे फिटनेस सीक्रेट )
advertisement
रेखाने तिच्या अनोख्या शैलीने आणि सौंदर्यावर आजवर सगळेच भाळले आहेत. बर्थडे पार्टीतही रेखाने सगळ्यांचं लक्ष वेधलं. पार्टीत आधी शबाना आझमी आणि जावेद अख्तर यांनी रोमँटिक डान्स केला. दोघांनी 'प्रिटी लिटील बेबी...' या गाण्यावर डान्स केला. या कपलचं सगळ्यांची कौतुक केलं. शबाना आझमी यांचा डान्स झाल्यानंतर रेखा आणि माधुरी पुढे आल्या, पण माधुरीसमोर रेखा भाव खाऊन गेल्या. त्यातही उर्मिला रेखाच्या जवळ आली आणि नाचू लागली. फराह खान या सगळ्यांना पाहतच राहिला. त्याने त्याचा फोन काढला सगळ्या अभिनेत्रींचे व्हिडीओ शूट केले.
शबाना आझमींच्या बर्थडे पार्टीत रेखाने स्टायलिश ऑल-व्हाइट लूक केला होता. स्टेटमेंट कोट, पगडी-स्टाईल हेडगियर, ओव्हरसाईज सनग्लासेस आणि बोल्ड सोनेरी ज्वेलरी वेअर केली होती. विद्या बालन टेक्सचर्ड डिटेलिंगसह राखाडी गाऊनमध्ये दिसली.
माधुरी, उर्मिला आणि विद्या शाइन माधुरी दीक्षित लाल रेड कलरच्या ड्रेसमध्ये दिसल्या. उर्मिला मातोंडकर सोनेरी आणि काळ्या कलरच्या ड्रेसमध्ये चमकत होती. तर बर्थडे गर्ल शबाना आझमी यांनी चमकदार रेड बॉर्डर्स आणि स्टेटमेंट ब्रोचमध्ये दिसल्या.