रिंकूचा आई आशा सिनेमा पाहून खूप इमोशनल झाली. सिनेमा संपल्यानंतर रिंकूला मिठी मारून रडू लागली. यावेळी रिंकू तिच्या आईची आई झाली. ती आईला प्रेमानं शांत करताना दिसली. मेकअप खराब होईल मम्मा..! असं रिंकूने आईची प्रेमानं समजूत काझली. रिंकू आईच्या डोळ्यातील आनंदाश्रू तिच्या कामाची सगळ्यात मोठी पोचपावती होती. लेकीच्या यश त्यांच्या डोळ्यांत स्पष्टपणे दिसत होतं.
advertisement
( Rinku Rajguru : 'आर्ची'वर वरचढ ठरणार रिंकूची 'आशा'? 2 मिनिटं 18 सेकंदाचा VIDEO, शेवट चुकवू नका )
रिंकू आणि तिच्या आईचा हा इमोशनल व्हिडीओ पाहून चाहते देखील इमोशनल झालेत. मायलेकीचा हा बाँड पाहून सगळ्यांनी आनंद व्यक्त केलाय. माझी आई माझी बेस्ट फ्रेंड असल्याचं रिंकूने अनेक मुलाखतींमध्ये सांगितलं होतं ते प्रत्यक्षात आशा सिनेमाच्या निमित्तानं पाहायला मिळालं.
सिनेमा पाहण्याआधी प्रीमियरच्या आलेल्या रिंकूने आई-वडिलांसोबत फोटोंसाठी पोझेस दिल्या. फोटो काढण्यासाठी रिंकू आई-वडिलांना छान टिप्सही देताना दिसली. प्रीमियर सोहळ्यासाठी रिंकूनं पिवळ्या रंगाची साडी नेसली होती. केसात गजरा, मिनीमल मेकअप अश्या साध्या पण देखण्या लुकमध्ये रिंकू दिसली.
रिंकू राजगुरूनं आशा सिनेमात आशा सेविकांची भूमिका साकारली आहे. आशा सेविकांचं आयुष्य आणि त्यांच्या कामावर या सिनेमातून प्रकाश टाकण्यात आला आहे. रिंकूसाठी हा सिनेमा अत्यंत स्पेशल आहे कारण या सिनेमासाठी तिला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा राष्ट्रीय पुरस्कार देण्यात आला.
सैराटनंतर रिंकूचा एक वेगळा अवतार प्रेक्षकांना आशा सिनेमात पाहायला मिळणार आहे. सैराटमध्ये बुलेटवरून येणारी रिंकू आशामध्ये साडी नेसून सायकल चालवताना दिसत आहे. आशा हा सिनेमा सैराटनंतर रिंकूची असलेली इमेज ब्रेक करणार असं म्हटलं जात आहे. सिनेमाला प्रेक्षक किती प्रतिसाद देतात याकडे आता सगळ्यांचं लक्ष लागून आहे.
