'हम किसी से कम नहीं' या चित्रपटाचे मुख्य नायक होते दिवंगत अभिनेता ऋषी कपूर. त्यांच्यासोबत झीनत अमान ही नायिका होती. झीनत अमान उंच बांध्याची होती, त्यामुळे दोघे जेव्हा कॅमेऱ्यासमोर आले तेव्हा फरक स्पष्ट दिसत होता. हे पाहून ऋषी कपूर अस्वस्थ झाले आणि त्यांनी दिग्दर्शकावर नाराजी व्यक्त केली.
advertisement
झीनत अमानने याविषयी एका मुलाखतीत उल्लेख केला. तिने सांगितलं की चित्रपटातील एका कव्वाली गाण्यात ऋषी कपूर यांच्यासोबत फ्लर्टिंग सीन शूट करायचा होता. पण माझी उंची जास्त असल्यामुळे ते खूप चिडले. अखेरीस उपाय म्हणून ऋषी कपूरना सोफ्यावर बसवण्यात आले. इतकेच नव्हे तर त्यांना दोन गाद्यांवर बसवले गेले, जेणेकरून उंचीचा फरक दिसू नये.
ही घटना तेव्हाही चित्रपटसृष्टीत चर्चेचा विषय ठरली होती आणि आजही चाहत्यांना ती किस्सा म्हणून आवडते. ऋषी कपूर आणि झीनत अमान यांची जोडी त्या काळी हिट मानली जात होती. हम किसी से कम नहीं हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर प्रचंड यशस्वी ठरला आणि त्यातील गाणी आजही लोकांच्या ओठावर आहेत.