‘राजा शिवाजी’ हा फक्त एक चित्रपट नाही, तर स्वराज्याच्या संकल्पनेचा जागर आहे, असं निर्माते म्हणतात. चित्रपटाची घोषणा आणि त्यामागचा व्यापक दृष्टिकोन यामुळे सध्या सिनेविश्वात आणि इतिहासप्रेमींमध्ये उत्साहाचं वातावरण आहे. या भव्य प्रकल्पाची निर्मिती जिओ स्टुडिओज आणि मुंबई फिल्म कंपनी (Genelia Deshmukh यांच्या नेतृत्वाखाली) एकत्रितपणे करत आहेत. विशेष म्हणजे हा चित्रपट मराठीसह हिंदी, तमिळ, तेलुगू, कन्नड आणि मल्याळम या सहा भाषांमध्ये एकाच दिवशी प्रदर्शित होणार आहे.
advertisement
अशातच हा चित्रपट थेट १ मे २०२६ रोजी, महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने, जगभरात प्रदर्शित होणार आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारीत हा चित्रपट त्यांच्या तरुणपणापासून स्वराज्य स्थापनेपर्यंतचा संघर्ष, पराक्रम आणि दूरदृष्टी यांचे भव्य चित्रण करणार आहे.
रितेशसह या चित्रपटात संजय दत्त, अभिषेक बच्चन, महेश मांजरेकर, सचिन खेडेकर, भाग्यश्री, जितेंद्र जोशी, फरदीन खान आणि अमोल गुप्ते हे मोठे कलाकार झळकणार आहेत. संगीत दिग्दर्शनासाठी अजय-अतुल ही जोडी सज्ज असून, छायाचित्रणाची धुरा ख्यातनाम संतोष सिवन यांनी सांभाळली आहे. विशेष म्हणजे हे त्यांच्या मराठी सिनेसृष्टीतील पहिले पदार्पण असणार आहे.