रुचिताने तिच्या इन्स्टाग्रामवर पोस्ट लिहित रोहित आर्यने तिच्याशी संपर्क साधल्याचं सांगितलं. न्यूज 18लोकमतशी बोलताना रुचिताने सांगितलं, 2010 साली एक सिनेमा केला होता. त्याच्या स्टुडिओमध्ये मी डबिंग करायला गेली होती. तेव्हा रोहित आर्याशी ओळख झाली होती. 2010-11ची गोष्ट आहे ही. तेव्हा ते प्रोड्यूसर आहे, लिहितो असं इंट्रोड्युस करण्यात आलं होतं. त्यानंतर नंबर एक्सचेंज झाले होते. त्यानंतर काहीच संपर्क झाला नाही. मला माहिती होतं की ते गव्हरमेन्टचे सिनेमे आणि प्रोजेक्ट करतात. 4 ऑक्टोबरला मला त्यांचा मेसेज येतो. मी फिल्म करतोय
advertisement
( मृत्यूनंतर रोहित आर्याचे हाल, पोस्टमार्टममध्ये मोठा अडथळा, एन्काऊंटर प्रकरणात नेमकं काय घडतंय? )
दुपारी 2.52 ला त्याने मेसेज केला होता. संध्याकाळी सहाच्या सुमारास मी त्यांना रिप्लाय केला मी आता फ्री आहे आपण फोनवर केव्हा बोलायचं. तेवढ्यात त्यांनी मला 7.15 ला पिंग केला मी फ्री आहे. मी त्यांना फोन केला. नऊ मिनिटांचा फोन कॉल केला.
त्यांनी मला स्टोरी सांगितली की, एक इनोसंड माणूस असतो. नसीरुद्दीन शाहची वेनस्टडेची स्टोरी आहे तिच आपल्याला करण्याचा प्रयत्न करतोय. तो पिक्चर आहे असं त्यांनी मला सांगितलं. तो माणूस प्रचंड इनोसेंट असतो. तो काही मुलांना होस्टेस ठेवतो. त्याच्या काही डिमांड असतात. पण तो माणूस खूप चांगला असतो. मी त्याला विचारलं की माझा रोल काय असतो. एक तर ती टिचर किंवा एक पॅरेंट जो किडनॅपरचा मेसेज पोलिसांपर्यंत पोहोचवतील.
मला या गोष्टीचा अंदाज आला नव्हता. तो बोलताना खूप सेन्सिबल वाटत होता. त्याच्याकडे संपूर्ण स्टोरी लिहिलेली होती. असे अनेक फोन येतात जे फोनवर नरेशन देतात. नंतर म्हणतात की, आपण भेटूया. त्यांनी मला 23 ऑक्टोबरला मेसेज केला होता की, 27-28-29 मध्ये भेटायला जमेल का? त्यातील मी 28 तारीख सांगितली होती. त्याने मला या सोमवारी मेसेज केला आपण मंगळवारी तू मला भेटू शकते का RA स्टुडीओला. त्याने मला लोकेशन पाठवलं होतं. माझ्या सासऱ्यांची तब्येत ठीक नव्हती. ते अँडमिट होते त्यामुळे जाऊ शकले नाही. मी त्यांना मेसेज केला की मी येऊ शकले नाही. आपण 15 नोव्हेंबरनंतर भेटूयात.
रूचिताने तिच्या पोस्टमध्ये लिहिलंय, "आज 31 ऑक्टोबरला, जेव्हा मी या व्यक्तीशी संबंधित भीषण घटनेची बातमी पाहिली तेव्हा मला भीती वाटली. मी किती जवळ पोहोचले होते. मी देवाचे, माझ्या कुटुंबाचे अत्यंत आभारी आहे. मला खरंच वाटतं की वर कुणीतरी माझं संरक्षण करत होतं. या घटनेने मला लक्षात आलं आणि मला आशा आहे की तुमच्याही हे लक्षात येईल. नवीन लोकांशी कामासाठी भेटताना अत्यंत सावध राहणं आवश्यक आहे, जरी सर्व काही सामान्य वाटत असेल तरी. कृपया सुरक्षित राहा, तुमच्या अंतर्ज्ञानावर विश्वास ठेवा, आणि नेहमी तुमच्या भेटींची माहिती कुटुंब किंवा मित्रांशी शेअर करा प्रेम आणि काळजी व्यक्त करणाऱ्या सर्व लोकांचे धन्यवाद."
