चाहती भेटली अन् 500 रुपये दिले!
सचिन पिळगांवकर यांनी INN न्यूजला दिलेल्या एका मुलाखतीची क्लिप सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये ते एका अविस्मरणीय भेटीबद्दल सांगत आहेत. सचिन म्हणाले, "मी बॅडमिंटन खेळून स्पोर्ट्स कॉम्प्लेक्समधून बाहेर पडत होतो. तेवढ्यात माझ्यासमोर ३५-४० वयोगटातील एक महिला आली. ती माझी खूप मोठी फॅन असल्याचे सांगू लागली. तिने माझे अनेक चित्रपट पाहिले होते."
advertisement
तारीख ठरली! कतरिना या दिवशी होणार आई, बाबा विकीचा आनंद गगनात मावेना, म्हणाला 'यानंतर मी घरातून...'
या भेटीच्या शेवटी त्या चाहतीने सचिन यांचे आभार मानले आणि ५०० रुपयांची एक नोट काढली. ती म्हणाली, "माझ्याकडे तुम्हाला देण्यासाठी दुसरं काही नाही, कृपया हे पैसे घ्या." सचिन यांनी ५०० रुपयांच्या या भेटीचा किस्सा सांगितल्यानंतर पुन्हा एकदा नेटकऱ्यांच्या भुवया उंचावल्या आहेत.
ट्रोलर्सना ट्रोल करायला मिळाला नवा विषय
सचिन यांनी आपल्या वैयक्तिक आयुष्यातील भावनिक गोष्ट सांगत असतानाही, सोशल मीडिया युजर्सनी मात्र ट्रोलिंगची संधी सोडली नाही. 'bakchhodddd' या इन्स्टाग्राम पेजवरून हा व्हिडिओ शेअर करण्यात आला असून, त्यावर हजारोंनी प्रतिक्रिया येत आहेत.
एका युझरने विचारले, "ही चर्चा उर्दूमध्ये झाली होती का?" तर दुसऱ्या युझरने थेट लिहिले, "५०० रुपये घ्या, पण आम्हाला अशा पद्धतीनं छळू नका." तर आणखी एका युझरने अशा मुलाखतींमुळेच मराठी कलाकार ट्रोल होतात, अशी खंत व्यक्त केली आहे.
सचिन पिळगांवकर यांच्या या नव्या किस्स्याला मिळालेल्या या विचित्र प्रतिसादावरून सध्या सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगली आहे.