तारीख ठरली! कतरिना या दिवशी होणार आई, बाबा विकीचा आनंद गगनात मावेना, म्हणाला 'यानंतर मी घरातून...'
- Published by:Pratiksha Pednekar
Last Updated:
Vicky Kaushal Katrina Kaif baby : 'छावा' फेम अभिनेता विकीने पालक होण्याबद्दलचे आपले भावनिक विचार व्यक्त केले असून, त्याने वडील होणे हा एक 'मोठा आशीर्वाद' असल्याचे म्हटले आहे.
मुंबई : बॉलिवूडचे पॉवर कपल विकी कौशल आणि कतरिना कैफ यांच्या घरी लवकरच लहान पाहुणा येणार आहे. सध्या विकी कौशलने एका मुलाखतीत ही गोड बातमी देत, आपण जवळजवळ तिथे पोहोचलो आहोत, असे सांगून चाहत्यांची उत्सुकता आणखी वाढवली आहे. 'छावा' फेम अभिनेता विकीने पालक होण्याबद्दलचे आपले भावनिक विचार व्यक्त केले असून, त्याने वडील होणे हा एक 'मोठा आशीर्वाद' असल्याचे म्हटले आहे.
बाबा बनण्यासाठी विकी कौशल खूपच एक्सायटेड
विकी कौशल आणि कतरिना कैफ यांनी सप्टेंबर महिन्यातच सोशल मीडियावर कतरिनाच्या प्रेग्नन्सीची घोषणा केली होती. नुकत्याच 'युवा' सोबतच्या एका पॉडकास्टमध्ये विकीने लवकरच बाबा होण्याबद्दलचा आपला उत्साह व्यक्त केला.
विकी कौशल म्हणाला, "मी फक्त वडील बनण्यासाठी उत्सुक आहे. मला वाटते हा एक खूप मोठा आशीर्वाद आहे आणि हे दिवस खूप रोमांचक आहेत. आम्ही जवळजवळ तिथे पोहोचलो आहोत, त्यामुळे क्रॉस फिंगर्स! मला वाटते की, यानंतर मी घरातून बाहेरच पडणार नाही!" आपल्या बाळासोबत वेळ घालवण्यासाठी तो किती उत्सुक आहे, हे त्याच्या बोलण्यातून स्पष्ट दिसत होते.
advertisement
कौशल कुटुंबात आनंदाचे वातावरण
विकीचा धाकटा भाऊ आणि अभिनेता सनी कौशल यानेही यापूर्वी एका मुलाखतीत कुटुंबातील भावना व्यक्त केल्या होत्या. सनी म्हणाला होता, "सर्वांना खूप आनंद आहे, पण पुढे काय होणार याबद्दल थोडीशी भीती आणि उत्सुकताही आहे. आम्ही त्या दिवसाची वाट पाहत आहोत."
advertisement
विकी-कतरिनावर शुभेच्छांचा वर्षाव
विकी आणि कतरिनाच्या चाहत्यांनी सोशल मीडियावर या कपलवर प्रेमाचा आणि शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. एका चाहत्याने 'रेडिट'वर लिहिले, "कतरिनाला खूप दिवसांपासून बाळ हवे होते आणि आता बाळ लवकरच येणार आहे. ते दोघेही उत्तम पालक बनतील." तर दुसऱ्याने लिहिले, "या जोडप्याला कोणाची नजर न लागो! ते खूप चांगले पालक असतील."
advertisement
advertisement
कतरिना कैफ आणि विकी कौशलने २३ सप्टेंबर रोजी इन्स्टाग्रामवर एका पोलरॉइड-शैलीतील फोटोद्वारे कतरिनाची प्रेग्नन्सी जाहीर केली होती. या फोटोत विकी कतरिनाचा बेबी बंप धरलेला दिसत होता. विकीने या खास क्षणांना 'मोठा आशीर्वाद' असे म्हटले आहे. त्याचे हे शब्द त्यांच्या वैयक्तिक आयुष्यातील हा आनंद आणि भावनिक जवळीक दर्शवतात.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
October 15, 2025 5:40 PM IST
मराठी बातम्या/मनोरंजन/
तारीख ठरली! कतरिना या दिवशी होणार आई, बाबा विकीचा आनंद गगनात मावेना, म्हणाला 'यानंतर मी घरातून...'