कलाकृती मीडियाशी बोलताना दिलीप ठाकुर म्हणाले, "सचिन जींचं हे स्टेटमेन्ट ऐकून आश्चर्य वाटलं. शोले हा अमजद खानचा पहिला सिनेमा नाहीये. अमजद हा जयंत नावाचे अभिनेते होते 50-60च्या दशकात. 'मेरा गाव मेरा देश'मध्ये सुद्धा होते. जयंत यांची दोन मुलं इम्तियाज खान आणि अमजद खान. इम्तियाज खान अमजदच्या आधीच सिनेमात आला होता. तो अनेक सिनेमात आहे."
advertisement
( 19 दिवस शूटींग, सिनेमानं 35 कोटी कमावले; पण सचिन पिळगावकरांना मानधन नाही, मिळाला होता फ्रीज )
"अमजदने लहानपणी अनेक सिनेमात काम केलं आहे. 'माया', 'लव्ह एन्ड गॉड' सारख्या सिनेमात त्याने लहानपणी काम केलं आहे. मोठेपणी त्याने चेतन आनंद यांचा 'हिंदुस्तान की कसम' सिनेमात छोटासा रोल केला आहे. अमजद खान हा रंगभूमीवरचा कलाकार आहे. पृथ्वी थिएटरमध्ये त्यांचं एक काम बघूनच जावेद अख्तरनी त्यांचं नाव रमेश सिप्पी यांना सुचवलं होतं. ज्याला या माध्यमाची माहिती आहे. रंगभूमीवरून आलेल्या कलाकाराला एक्सप्रेशन आणि आवाजाची पट्टी काय असते हे सगळ्यांना माहिती आहे."
दिलीप ठाकुर पुढे म्हणाले, "सचिन जींनी जे सांगितलं त्यावर मी बोलायची काही गरज नाही. कारण सोशल मीडियावर शोलेच्या चाहत्यांनी, गब्बरच्या चाहत्यांनी इतकंच काय तर सचिन जींच्या चाहत्यांनीही सुद्धा जे काही भाष्य केलं आहे, मला वाईट वाटलं. ट्रोलिंग केलं."
सचिन पिळगावकर यांनी शोलेमध्ये रमेश सिप्पींबरोबर मी सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम केलं होतं, असंही एका मुलाखतीत सांगितलं होतं. याविषयी बोलताना दिलीप ठाकुर म्हणाले, "शोलेचे टायटल बघितले तर रमेश सिप्पींच्या सहाय्यकांमध्ये सचिन पिळगावकर हे नावच नाही. सात दिग्दर्शक होते पण हे नाव नाहीये. हे अधोरेखित करायला पाहिजे. रमेश सिप्पी हे असे दिग्दर्शक होते जे अशाप्रकारचा हस्तक्षेप करतील असं मला वाटत नाही.
आता सचिन जींनी हे असं का म्हटलं याचं मला आश्चर्य वाटतं. सचिन जींचा आणि माझा परिचय हा देखील 40 वर्षांचा आहे. पण हे जे काही चाललंय याचं उत्तर माझ्याकडे नाहीये."