मिर्ची मराठीली दिलेल्या मुलाखतीत सचिन पिळगावकर यांनी सांगितलं, "एप्रिसिएशन माझ्या स्वभावात आहे. मला चांगलं आधी दिसतं. त्यासाठी मी प्रॅक्टिस केलेली नाही. हे उपजत आहे. मला आधी चांगलं दिसतं त्यामुळे मला जे दिसतं ते मी बोलतो. मला अप्रिशिएट करावंस वाटलं तर मी करतो. मला कोणाविषयी मनापासून आदर वाटला तर, पाय धरावेसे वाटले तर मी पाय धरतो."
advertisement
( अभिनेते सचिन पिळगावकर यांना कसं पडलं 'महागुरू' हे नाव? त्यांनी स्वत:च सांगितलं )
ते पुढे म्हणाले, "मी अभिनेता असेन, मी प्रसिद्ध असेन या सगळ्या मी जन्माला आल्यानंतरच्या गोष्टी आहेत. परमेश्वराने मला माणूस म्हणून जन्माला घातलं आहे. त्यामुळे मला माणूस म्हणून जगणं आवश्यक आहे. चांगलं दिसणं वेगळं आणि ते दिसणं वेगळं. एप्रिसिएट करणं आणि बोलून दाखवणं हे मी माझ्या गुरूंकडून शिकलो आहे. तेव्हा जेव्हा मी एक चांगला शॉट द्यायचो किंवा चांगला डान्स करायचो तेव्हा माझ्या डायरेक्टरकडून किंवा कोरिओग्राफरकडून मला एक रुपया मिळायचा. लहान असताना हे मिळाल्यामुळे त्याचं खूप अप्रुप वाटायचं. मग त्या रुपयाचे दहा रुपये झाले. ते दहा रुपये मिळणं म्हणजे खूप मोठी गोष्ट होती."
सचिन पिळगावकर यांनी एका पेक्षा एकबद्दल सांगितलं. ते म्हणाले, "एकापेक्षा एक जेव्हा मी केलं तेव्हा ते शंभर रुपये झाले होते. तेव्हा नोटेची वॅल्ह्यू वाढली होती. त्यामुळे ते शंभर रुपये. मी त्यांना ते दिल्यानंतर त्यांनी ते शंभर रुपये जपून ठेवले आहेत. काही काही लोकांनी त्याचे फ्रेम्स केले आहेत. माझ्या सह्यापण घ्यायचे ती मुलं. ही प्रथा मी अजूनही सुरू ठेवलेली आहे. जर मला कोणाचं काम आवडलं तर मी त्या शंभर देतो. खर्च करू नको पण ठेव तुझ्याकडे."