सैफने ही घटना काजोल आणि ट्विंकल खन्ना यांच्या शोमध्ये सांगितली. त्याने म्हटलं, "रात्री जवळपास दोन वाजले असतील. करिना जेवायला बाहेर गेली होती आणि मी घरीच होतो. अचानक आमच्या कामवालीने सांगितले की कोणीतरी घरात घुसला आहे. जेहच्या खोलीत एक माणूस चाकू घेऊन उभा होता."
'दशावतार'चा बॉक्स ऑफिसवर गडगडाट! चौथ्या आठवड्यातही थिएटर्स हाऊसफुल
advertisement
अभिनेता पुढे म्हणाला, "मी तिथे गेलो तेव्हा त्या माणसाच्या दोन्ही हातात चाकू होते. त्याने माझ्या पायावर वार केला. माझ्या पायातून रक्त वाहत होते. मी घाबरलो होतो पण मला जेहला सुरक्षित ठेवायचं होतं." सैफने सांगितलं की त्याचा मोठा मुलगा तैमूरही त्या वेळी उपस्थित होता. "माझ्या पायात रक्त वाहत होतं तेव्हा तैमूर माझ्याकडे पाहून विचारलं, ‘डॅड, तू मरणार आहेस का?’ मी त्याला शांत करत म्हणालो, 'नाही, मला वाटत नाही.'" हे ऐकून शोवरील काजोल भावुक झाली आणि सैफला मिठी मारली.
काजोल म्हणाली, "तू खराच हिरो आहेस, कारण त्या क्षणी कोणीही घाबरलं असतं." ट्विंकल खन्नालाही ही गोष्ट ऐकून धक्का बसला. दोघींनीही सैफच्या धैर्याचे कौतुक केले. घटनेनंतर सैफने पोलिसांना माहिती दिली. तपासात समजले की आरोपी एक स्थानिक व्यक्ती होता ज्याला सैफच्या घराजवळ काम करणाऱ्यांनी आधी पाहिले होते. त्याने पैसे मागण्याचा प्रयत्न केला आणि परिस्थिती हाताबाहेर गेली. पोलिसांनी त्याला अटक केली असून चौकशी सुरू आहे.