tv9हिंदीला दिलेल्या मुलाखतीत सलमान खाननं सांगितलं, 'लहानपणी सुट्ट्यांमध्ये आम्ही नेहमी इंग्रजी सिनेमे पाहायचो. घरी व्हिडीओ कॅसेट यायच्या आणि आम्ही तासंतास बघत बसायचो. त्या सिनेमात मध्येच कुठेतरी किसिंग सिन यायचा. तो पाहताना आम्ही सगळे अनकम्फर्टेबल व्हायचो. आम्ही जे अनुभवलं ते माझ्या चाहत्यांनी देखील अनुभवावं असं मला वाटत नाही. मी नेहमी माझ्या संपूर्ण फॅमिलीबरोबर बसून सिनेमा पाहतो. माझे सिनेमे देखील आई-बाबा, आजी-आजोबा, लहान मुलांनी बसून पाहावेत असं मला वाटतं. माझे सिनेमे पाहातना कोणालाही अजिबात अनकम्फर्टेबल व्हावं असं मला वाटत नाही.'
advertisement
हेही वाचा - Salman Khan Birthday : 2000 कोटींचा मालक असलेल्या सलमानचा पहिला पगार माहितीये? हॉटेलमध्ये केलं होतं काम
सलमान खान पुढे म्हणाला, 'मी ही गोष्टी माझ्या आतापर्यंतच्या करिअरमध्ये कायम लक्षात ठेवली आहे. त्यामुळे आजही माझे चाहते माझ्याशी जोडले गेले आहेत. मला चाहत्यांचं प्रेम मिळतं. काही असे सिनेमेही असतात जे तुम्ही तुमच्या मित्रांबरोबर पाहू शकता आणि काही सिनेमे एकट्यात पाहू शकता. मी माझ्या वडिलांकडून प्रेरणा घेतली. त्यांच्या सिनेमात व्हिलन कधीच अभिनेत्रीबरोबर गैरवर्तन करताना दिसत नाही.'
सलमान खाननं अभिनेत्री भाग्यश्रीबरोबर मेने प्यार किया या सिनेमात एक किसिंग सीन केला होता. तो किसिंग आजही प्रेक्षकांना आवडतो. एका आरशावर हा किसिंग केला होता. तर राधे या सिनेमात दिशा पाटणी आणि सलमान खानचा एक किसिंग सीन होता ज्यात दिशानं तिच्या ओठांवर टेप लावली होती. सलमाननं त्याच्या आतापर्यंतच्या 35 वर्षांच्या करिअरमध्ये नो किसिंग पॉलिसी कायम ठेवली आहे.