Salman Khan Birthday : सलमान खानचं मिड नाईट बर्थडे सेलिब्रेशन, खास व्यक्तीबरोबर कापला केक, VIDEO
- Published by:Minal Gurav
Last Updated:
सलमान खानच्या बर्थडेसाठी संपूर्ण खान कुटुंब सहभागी झालं होतं. बर्थडे सेलिब्रेशनचा व्हिडीओ सोशल मीडियावर पाहायला मिळतोय.
मुंबई, 27 डिसेंबर : बॉलिवूडचा भाईजान आज त्याचा 58वा वाढदिवस साजरा करत आहे. सलमानप्रमाणे हा दिवस त्याच्या प्रत्येक चाहत्यासाठी देखील तितकाच खास आहे. सलमान खान आणि त्याची लाडकी भाची आयत यांचा वाढदिवस एकाच दिवशी असल्यानं दरवर्षी भाचीबरोबर सलमान खान आपला वाढदिवस साजरा करतो. मामा- भाचीच्या बर्थडे सेलिब्रेशनला खान कुटुंबातील सगळे मंडळी एकत्र आली. अर्पिता खान आणि आयुष शर्मा यांच्या चेहऱ्यावर लेकीच्या बर्थडे सेलिब्रेशनचा आनंद दिसत होता. सलमानच्या बर्थडे सेलिब्रेशनचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर पाहायला मिळत आहेत.
भाईजानच्या बर्थडेसाठी खास थ्री टियर केक मागवण्यात आला होता. व्हिडीओमध्ये पाहायला मिळतंय की संपूर्ण खान कुटुंब बर्थडे सेलिब्रेशनसाठी उपस्थित आहे. नुकतंच लग्न झालेला अरबाज खान त्याची बायको आणि मुलगा अरहान देखील दिसतोय. इतकंच नाही तर अभिनेता बॉबी देओल देखील लाडक्या भाईजानच्या बर्थडे सेलिब्रेशनसाठी आला होता. बर्थडे सेलिब्रेशनमध्ये सलमान खान ब्लॅक शर्ट आणि मॅचिंग जॅकेटमध्ये दिसला.
advertisement
हेही वाचा - Salman Khan Birthday : 2000 कोटींचा मालक असलेल्या सलमानचा पहिला पगार माहितीये? हॉटेलमध्ये केलं होतं काम
Megastar celebrations #SalmanKhan #HappyBirthdaysalmankhan pic.twitter.com/O1nyKrDJzt
— Ifty khan (@Iftykhan15) December 26, 2023
सलमान खानच्या अनेक महत्त्वाच्या क्षणी त्याची रूमर्ड गर्लफ्रेंड यूलिया वंतूर दिसते. बर्थडे पार्टीमध्ये देखील यूलिया सहभागी झाली होती. त्याचप्रमाणे खान कुटुंबातील अरबाज खान, अभिनेत्री हेलन, अलवीरा, आयुष शर्मा, अर्पिता खान सगळे उपस्थित होते.
advertisement
अभिनेता बॉबी देओलनं सलमान खानच्या बर्थडे सेलिब्रेशनसाठी खास हजेरी लेवली होती. बॉबीनं सलमान खान बर्थडे विश करत खास मिठी मारली. त्यानंतर गालावर किस देखील केलं. सलमानला गालावर किस करतानाचा सेल्फी बॉबी देओलनं शेअर केला आहे. दोघांची मैत्री किती घट्ट आहे हे यावरून दिसून आलं.
Location :
First Published :
December 27, 2023 8:59 AM IST
मराठी बातम्या/मनोरंजन/
Salman Khan Birthday : सलमान खानचं मिड नाईट बर्थडे सेलिब्रेशन, खास व्यक्तीबरोबर कापला केक, VIDEO