पण तुम्हाला माहिती आहे का, इतके वर्ष सलीम खान यांनी त्यांच्या मुलांसाठीही जे केलं नाही ते आज नातवासाठी केलं. 89 वर्षांच्या सलीम खान यांनी त्यांच्या नातवासमोर गुडघे टेकलेत. मुलगी अर्पिता खान शर्मा हिने इंस्टाग्रामवर एक असा व्हिडिओ शेअर केला. हा व्हिडीओ सगळ्यांचं मन स्पर्शून गेला आहे.
( Salman Khan: 59 व्या वर्षी सलमान खानचा शर्टलेस अंदाज, स्विमिंग पूलमधील हॉट फोटो केले शेअर! )
advertisement
अर्पिताने शेअर केलेल्या व्हिडिओत 89 वर्षांचे सलीम खान आपल्या लाडक्या नातवाला अहिल शर्माला पाठीवर घेऊन खेळताना दिसत आहेत. अगदी एखाद्या लहान मुलासारखे, आनंदाने आणि मायेने सलीम खान नातबरोबर खेळत आहेत. त्यांच्या बाजूला सलमान खान उभा राहून आपल्या वडिलांचा हा प्रेमळ क्षण एन्जॉय करतोय.
व्हिडिओमध्ये सलीम खान गुडघ्यावर बसून अहिलसोबत घोडा-घोडा खेळत आहेत. आजोबांचे प्रेम आणि नातवाचा आनंद या व्हिडीओमध्ये पाहायला मिळतोय. 'किधर जाना है अब, ए बता ना', असं सलीम खान नातवाला प्रेमानं विचारताना दिसत आहेत. 89 वर्षांच्या वयातही नातवासाठी इतका उत्साह, इतकं प्रेम पाहून सगळेच भारावलेत.
सलमान खानही त्या क्षणी एक मुलगा म्हणून आपल्या वडिलांकडे अभिमानाने पाहताना दिसतो. तो हळूच अहिलला धरून सलीम खान यांना मदत करताना दिसतोय. तिन्ही पिढ्यांचं प्रेम एकाच फ्रेममध्ये पाहायला मिळतंय.