निर्मात्यांनी सांगितले की, 'दो दिवाने शहर में' ही एक अशी प्रेमकथा आहे जी टाइमलेस आहे, पण त्याचबरोबर नवीन सुद्धा वाटते. हा चित्रपट आगामी वर्षातील सर्वात गोड आणि हृदयस्पर्शी प्रेम कहाण्यांपैकी एक असेल, जो सिनेमागृहात खूप दिवसांपासून न पाहिलेला रोमान्स परत आणेल.
संजय लीला भन्साळी यांच्या चित्रपटामध्ये मराठी अभिनेत्रीची वर्णी
दरम्यान, संजय लीला भन्साळी यांच्या चित्रपटामध्ये अभिनेता सिद्धांत चतुर्वेदी प्रमुख भूमिकेत पाहायला मिळणार आहे. विशेष म्हणजे, या सिनेमामध्ये बॉलिवूडच्या बड्या अभिनेत्रींना वगळून मराठमोळ्या अभिनेत्रीला घेण्यात आले आहे. ही अभिनेत्री दुसरी कोणी नसून, संपूर्ण देशाला वेड लावलेली मृणाल ठाकूर आहे.
advertisement
सिनेमाच्या प्रोमोमध्ये सिद्धांत आणि मृणाल एका संक्षिप्त, पण भावपूर्ण रूपात दिसले आहेत, ज्यामुळे त्यांच्यातील शांत आणि रोमँटिक केमिस्ट्री अधोरेखित झाली आहे. हा प्रोमो रिलीज होताच चाहत्यांनी यावर प्रेमाचा वर्षाव केला असून, ते चित्रपटासाठी खूप उत्सुक झाले आहेत. चित्रपट निर्मात्या झोया अख्तर यांना देखील सिद्धांत आणि मृणालची ही जोडी खूप आवडली आहे.
स्क्रीनवर पहिल्यांदाच दिसणार फ्रेश जोडी
रवी उदयवार यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले असून झी स्टुडिओज आणि संजय लीला भन्साळी यांच्या भन्साळी प्रोडक्शन्सने याची निर्मिती केली आहे. सिद्धांत चतुर्वेदीने २०१९ मध्ये 'गली बॉय' मधील भूमिकेमुळे ओळख मिळवली आणि त्यानंतर त्याने १३ हून अधिक चित्रपटांमध्ये काम केले आहे. नुकताच त्याचा 'धडक-२' हा चित्रपटही रिलीज झाला होता.
मृणाल ठाकूरने टीव्हीवरून आपल्या करिअरला सुरुवात केली आणि आता ती बॉलिवूडमधील डिमांडिंग अभिनेत्रींपैकी एक आहे. अलीकडेच ती 'सन ऑफ सरदार-२' मध्ये अजय देवगनसोबत दिसली होती आणि तिने दोन डझनांहून अधिक चित्रपटांमध्ये काम केले आहे.
'दो दिवाने शहर में' हा चित्रपट २० फेब्रुवारी २०२६ रोजी सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे, जो व्हॅलेंटाईन डेच्या आठवड्यात येतो आहे. आता ही नवी जोडी बॉक्स ऑफिसवर किती जादू दाखवते हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
