4 मुलांच्या बापाच्या प्रेमात पडली प्रसिद्ध आयटम गर्ल, हट्टाने बनली दुसरी बायको, सावत्र मुलगा आहे बॉलिवूडचा सुपरस्टार

Last Updated:
Bollywood Controversial Love Story: बॉलिवूडमध्ये अनेक लव्हस्टोरी गाजल्या. त्यातील काही चाहत्यांना खूप आवडल्या, तर काही वादग्रस्त ठरल्या. अशातच या सुपरस्टारच्या वडिलांच्या लव्हस्टोरीनेही त्याकाळी वातावरण तापवलं होतं.
1/9
बॉलिवूड इंडस्ट्रीमध्ये काही टॉप घराणे आहेत, जे गेली अनेक वर्षे या इंडस्ट्रीवर राज्य करत आहेत. यातीलच एक कुटुंब म्हणजे सलमान खान याचे कुटुंब. सलमान खानचे वडील सलीम हे बॉलिवूडमध्ये प्रसिद्ध स्क्रीनरायटर म्हणून नावारुपाला आले होते आणि ते आपली चार मुले आणि पत्नीसह आनंदाचे आयुष्य जगत होते.

advertisement
2/9
मात्र, एक काळ असा आला आणि या कुटुंबामध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले. सलीम खान त्यांची पत्नी सलमा, चार मुले - सलमान, अरबाज, सोहेल, अलवीरा यांच्या कुटुंबात आणखी एका व्यक्तीची एन्ट्री झाली होती.

3/9
बॉलिवूडमध्ये सलीम खान आणि हेलेन यांची प्रेमकहाणी नेहमीच चर्चेचा विषय राहिली आहे. आज हेलेन खान कुटुंबाचा एक अविभाज्य भाग आहेत आणि सलमान खान पासून ते अरबाज पर्यंत सर्व मुले त्यांचा आदर करतात. पण एक काळ असा होता, जेव्हा हेलेन आणि सलीम खान यांच्या लग्नामुळे संपूर्ण खान कुटुंबात मोठे वादळ उठले होते.

4/9
७० च्या दशकात हेलेन बॉलिवूडमध्ये आपल्या नृत्याच्या जोरावर ओळख निर्माण करत होत्या. त्याच वेळी सलीम खान यांनी व्यावसायिक स्तरावर आणि वैयक्तिकरित्या हेलेनला पाठिंबा दिला. याच दरम्यान दोघांमध्ये हळूहळू प्रेम फुलू लागले.

5/9
सलीम खान तेव्हा आधीच विवाहित होते आणि त्यांना सलमा खान यांच्यापासून सलमान, अरबाज, सोहेल आणि अलवीरा अशी चार मुले होती.

6/9
हेलेन यांचेही हे दुसरे लग्न होते. त्यांचे पहिले लग्न प्रेम नारायण अरोरा यांच्याशी झाले होते, जे सुमारे १७ वर्षे चालले. मात्र, प्रेम नारायण अरोरा हे हेलेनच्या पैशांवर ऐश करत होते आणि त्यांनी हेलेनचे सर्व पैसे स्वतःच्या नावावर करून घेतले होते, असे सांगितले जाते.

7/9
पहिल्या लग्नातून विभक्त झाल्यानंतर हेलेन आणि सलीम खान यांचे नाते जोडले गेले आणि १९८१ मध्ये दोघांनी विवाह केला. सलीम खान यांनी कुटुंबाच्या इच्छेविरुद्ध हेलेन यांच्याशी दुसरे लग्न केले, ज्यामुळे खान कुटुंबात सुरुवातीला खूप कटुता आणि गोंधळ निर्माण झाला.

8/9
सलमा आणि त्यांची चारही मुले या लग्नाच्या सक्त विरोधात होती. एका मुलाखतीत हेलेन यांनी स्वतः कबूल केले होते की, सलीम खान आधीच विवाहित असल्याने त्यांना सुरुवातीला पश्चात्ताप झाला होता. खान कुटुंबाने सुरुवातीला हेलेनला स्वीकारले नाही, पण वेळेनुसार सर्व जखमा भरल्या. त्यांच्या नात्यांमध्येही हळूहळू सुधारणा झाली.

9/9
या कठीण काळात सलीम खान यांनी त्यांच्या मुलांना कसे समजावले, हे त्यांनी एका मुलाखतीत सांगितले होते. सलीम खान म्हणाले होते की, त्यांनी त्यांच्या मुलांना समजावले की,
या कठीण काळात सलीम खान यांनी त्यांच्या मुलांना कसे समजावले, हे त्यांनी एका मुलाखतीत सांगितले होते. सलीम खान म्हणाले होते की, त्यांनी त्यांच्या मुलांना समजावले की, "जर तुम्ही तुमच्या आई सलमासारखे त्यांना प्रेम देऊ शकत नसाल, तर निदान तोच सन्मान द्या." आज हेलेन आणि खान कुटुंबाचे संबंध खूप दृढ आहेत. सर्व मुले हेलेन यांना आईसमान प्रेम आणि आदर देतात.
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement