त्याला फिटचा अटॅक आला अन्
‘टाइम्स ऑफ इंडिया’ला दिलेल्या मुलाखतीत गरिमा सैकिया यांनी सांगितलं की, जुबिन त्याच्या टीममधील सात ते आठ लोकांसोबत एका यॉटवर होता. ते सगळे लाईफ जॅकेट घालून समुद्रात पोहायला गेले होते. गरिमा म्हणाल्या, “ते सगळे एकत्र पोहले आणि पुन्हा यॉटवर परतले. सगळ्यांनी लाईफ जॅकेट घातले होते. पण, जुबिनने पुन्हा पोहण्यासाठी पाण्यात उडी मारली आणि त्याला फिटचा अटॅक आला.”
advertisement
गरिमा यांनी सांगितलं की, जुबिनला याआधीही अनेक वेळा फिट्स आल्या होत्या. सिंगापूरमध्ये जेव्हा त्याच्या टीममधील लोकांना काहीतरी वेगळं घडत असल्याचा संशय आला, तेव्हा त्यांनी त्याला वाचवलं. त्याला तातडीने सिंगापूर जनरल हॉस्पिटलच्या आयसीयूमध्ये दोन तास ठेवण्यात आलं, पण त्याला वाचवता आलं नाही.
मुख्यमंत्र्यांनीही केला खुलासा
नुकत्याच झालेल्या एका पत्रकार परिषदेत आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनीही याबद्दल माहिती दिली. ते म्हणाले की, जुबिनचा एक व्हिडिओ समोर आला आहे, ज्यात तो लाईफ जॅकेट घालून पाण्यात उडी मारताना दिसत आहे. एका मिनिट आणि २६ सेकंदांनी तो यॉटवर परतला, पण नंतर पुन्हा त्याने जॅकेटशिवाय पाण्यात उडी मारली. मुख्यमंत्री म्हणाले, “जुबिनचा मृत्यू लाईफ जॅकेटशिवाय पोहताना झाला.” या सगळ्या खुलास्यांमुळे जुबिनच्या मृत्यूचं गूढ अखेर उलगडलं आहे.