Zubeen Garg Death : मुख्यमंत्र्यांनी स्वतः आणलं जुबिन गर्गचं पार्थिव! गायकाच्या निधनानंतर आसाममध्ये 3 दिवसांचा दुखवटा
- Published by:Pratiksha Pednekar
Last Updated:
Zubeen Garg Death : जुबिन गर्गच्या निधनामुळे आसाम सरकारने २० ते २२ सप्टेंबर या तीन दिवसांसाठी राज्य दुखवटा जाहीर केला आहे.
मुंबई : ‘या अली’ या गाण्याने देशभरात सगळ्यांना वेड लावणाऱ्या प्रसिद्ध गायक जुबिन गर्गच्या निधनाने संपूर्ण आसामवर दुःखाची लाट पसरली आहे. सिंगापूरमध्ये स्कूबा डायव्हिंग करताना झालेल्या अपघातात जुबिनने आपला जीव गमावला. त्याच्या निधनामुळे आसाम सरकारने २० ते २२ सप्टेंबर या तीन दिवसांसाठी राज्य दुखवटा जाहीर केला आहे, ज्यामुळे आसाममध्ये एक गंभीर आणि शोकाकुल वातावरण तयार झालं आहे.
सर्व सरकारी कार्यक्रमांवर बंदी!
मुख्य सचिव रवी कोटा यांनी याबद्दल अधिकृत घोषणा केली आहे. या तीन दिवसांच्या दुखवट्याच्या काळात आसाममधील सर्व सरकारी मनोरंजन, जेवण आणि इतर औपचारिक कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत. जुबिनच्या सन्मानार्थ हा निर्णय घेण्यात आला आहे.
Zubeen Garg Death : 23 वर्षापूर्वीही झाला होता जुबिन गर्गचा भयानक अपघात, मृत्यूला दिली होती हुलकावणी
advertisement
कोटा म्हणाले की, जुबिनच्या अचानक झालेल्या निधनामुळे सरकारला मोठा धक्का बसला आहे. या काळात काही आवश्यक सेवा जसे की, आरोग्य शिबिरे आणि इतर आरोग्यविषयक कामे सुरू राहतील. पण, इतर सर्व मोठे कार्यक्रम आणि लाभ वाटपाचे कार्यक्रम पुढे ढकलण्यात आले आहेत.
मुख्यमंत्र्यांनी स्वतः पार्थिव आणलं!
जुबिन गर्गचे पार्थिव दिल्लीत आल्यावर आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी स्वतः ते स्वीकारलं आणि ते पार्थिव घेऊन ते गुवाहाटीला परतले. जुबिनच्या मृत्यूची चौकशी करण्यासाठी सरकारने आता एक समिती नेमली आहे. त्याच्या मृत्यूशी संबंधित अनेक एफआयआर आता सीआयडीकडे सोपवण्यात आले आहेत. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदींसह देशभरातील अनेक कलाकारांनी जुबिनच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त केलं आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
September 20, 2025 8:22 PM IST
मराठी बातम्या/मनोरंजन/
Zubeen Garg Death : मुख्यमंत्र्यांनी स्वतः आणलं जुबिन गर्गचं पार्थिव! गायकाच्या निधनानंतर आसाममध्ये 3 दिवसांचा दुखवटा