TRENDING:

Actress Life: प्रेमासाठी ओलांडली धर्माची भिंत, 'शबनम' ची झाली 'सुरभी'; आता ओळखणंही कठीण

Last Updated:

Actress Life: कधीकाळी टीव्हीवर आपल्या निरागस चेहऱ्याने आणि साध्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात घर करणारी अभिनेत्री अनेक काळापासून गायब होती.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई : कधीकाळी टीव्हीवर आपल्या निरागस चेहऱ्याने आणि साध्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात घर करणारी अभिनेत्री अनेक काळापासून गायब होती. आता ती पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. बऱ्याच वर्षानंतर अभिनेत्रीला ओळखणंही कठिण झालं आहे.
 'शबनम' ची झाली 'सुरभी'
'शबनम' ची झाली 'सुरभी'
advertisement

आपण बोलत असलेली ही अभिनेत्री लोकप्रिय शो ‘कुबूल है’ मधील 'शिरीन' म्हणजेच अभिनेत्री शबनम सय्यद आहे. शिरीन या भूमिकेतून ती घराघरात पोहोचली होती. पण आता ती ना पडद्यावर दिसते, ना तिचं जुनं रूप ओळखता येतं.

Akshay Kumar ने मोडला सलमान खानचा सर्वात मोठा रेकॉर्ड, 'या' बाबतीत बॉक्स ऑफिसवर बनला किंग

advertisement

शबनमने प्रेमासाठी धर्म बदलला आणि तिचं करिअरची सोडून दिलं. शबनम सय्यदचं आयुष्य एका प्रेमकहाणीने बदललं. तिला एका गुजराती व्यावसायिकावर प्रेम झालं सौरभ वंजारा. दोघे काही वर्षे रिलेशनशिपमध्ये होते आणि शेवटी 2011 मध्ये त्यांनी लग्न केलं. पण हा विवाह आंतरधर्मीय होता. शबनम मुस्लिम होती, तर सौरभ हिंदू. प्रेमासाठी तिने धर्मही बदलला आणि हिंदू धर्म स्वीकारला.

advertisement

फक्त धर्म नाही, तर तिने आपलं नावही बदललं. आता ती शबनम नसून ‘सुरभी सौरभ वंजारा’ म्हणून ओळखली जाते. एका जुन्या मुलाखतीत ती म्हणाली होती, “माझ्या नवऱ्याचं कुटुंब नेहमी म्हणायचं की सौरभची पत्नीचं नाव सुरभी असावं. म्हणून मी माझं नावच सुरभी ठेवलं!”

‘हमारी सास लीला’ आणि ‘हिटलर दीदी’ सारख्या मालिकांमध्ये शबनमच्या अभिनयाचं कौतुक झालं होतं. पण लग्नानंतर तिने टीव्ही इंडस्ट्रीला कायमचा निरोप दिला. आता ती पूर्णपणे गृहिणी आहे. तिला अभिनयासोबतच कॉमेडीचीही आवड होती. त्यामुळे ती सोशल मीडियावर स्टँड-अप कॉमेडी व्हिडिओ बनवते. तिच्या इंस्टाग्रामवर तिचे फनी रील्स आणि शॉर्ट व्हिडिओज पाहायला मिळतात.

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
दिवाळीत गोड-धोड खायला नको वाटतं? तर हा पदार्थ ट्राय करा, बाकरवडीही फिकी!
सर्व पहा

अभिनेत्रीने लग्नानंतर स्वतःमध्ये मोठा बदल केला आहे. तिने बोटॉक्स ट्रीटमेंट घेतल्याचं समजतं आणि त्यामुळे तिचं चेहऱ्याचं रूप पूर्णपणे बदललं आहे. जुन्या “शिरीन”च्या तुलनेत ती आज अगदी वेगळी दिसते. सध्या सुरभी सौरभ वंजारा मुंबईतच आपल्या कुटुंबासोबत स्थायिक आहे. ती अधूनमधून सोशल मीडियावर अॅक्टिव्ह असते. तिच्या पोस्ट्समध्ये तिचं खुशाल आयुष्य, तिचं विनोदी रूप आणि तिचं बदललेलं व्यक्तिमत्त्व पाहायला मिळतं.

मराठी बातम्या/मनोरंजन/
Actress Life: प्रेमासाठी ओलांडली धर्माची भिंत, 'शबनम' ची झाली 'सुरभी'; आता ओळखणंही कठीण
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल