Akshay Kumar ने मोडला सलमान खानचा सर्वात मोठा रेकॉर्ड, 'या' बाबतीत बॉक्स ऑफिसवर बनला किंग

Last Updated:

Akshay Kumar: बॉलिवूड सुपरस्टार अक्षय कुमार हा दरवर्षी अनेक चित्रपट करून प्रेक्षकांच्या मनावर राज्य करतो.

Akshay Kumar ने मोडला सलमान खानचा रेकॉर्ड
Akshay Kumar ने मोडला सलमान खानचा रेकॉर्ड
मुंबई : बॉलिवूड सुपरस्टार अक्षय कुमार हा दरवर्षी अनेक चित्रपट करून प्रेक्षकांच्या मनावर राज्य करतो. त्याच्या चित्रपटांना प्रेक्षकांचा प्रेम मिळत असले तरी, काही वेळा बॉक्स ऑफिसवर अपेक्षित कमाई होत नाही. मात्र, 2025 मध्ये अक्षयची किस्मत चमकली आहे. अक्षयने सलमान खानचा रेकॉर्ड मोडला आहे. हा रेकॉर्ड नेमका काय आहे? याविषयी जाणून घेऊया.
अक्षय कुमार अलीकडे प्रदर्शित झालेला त्याचा चित्रपट 'जॉली एलएलबी 3' मुळे चर्चेत आहे. हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. चित्रपट प्रदर्शित होऊन फक्त 15 दिवस झाले असले तरी, जॉली एलएलबी 3ने जोरदार कमाई केली आहे.
advertisement
रिपोर्ट्सनुसार: भारतात कमाई: 104.15 कोटी. परदेशात कमाई: 28.25 कोटी. एकूण कमाई: 152 कोटी रुपये केली आहे.
या चित्रपटाच्या यशामुळे अक्षयने सलमान खानचा 100 कोटींपेक्षा जास्त कमाई करणाऱ्या 18 चित्रपटांचा विक्रम मोडला आहे. आता अक्षय कुमारकडे 19 चित्रपट आहेत, जे 100 कोटींपेक्षा जास्त कमाई करणारे झाले आहेत. यामुळे तो बॉलिवूडमधील सर्वाधिक 100 कोटी क्लबमध्ये असलेला अभिनेता बनला आहे.
advertisement
'जॉली एलएलबी 3' चित्रपटाची कथा आणि अभिनय प्रेक्षकांना खूप आवडला आहे. अर्शद वारसीचा कमेडी अंदाज पुन्हा रंगला आहे, ज्यामुळे चाहत्यांची पसंती वाढली आहे. थोड्या दिवसांत चित्रपटाची कमाई आणखी वाढण्याची अपेक्षा आहे, कारण अजूनही काही थिएटर्समध्ये 'हाऊसफुल' शो चालू आहेत.
दरम्यान,'जॉली एलएलबी 3' केवळ मनोरंजनाचा सिनेमा नाही, तर अक्षय कुमारच्या करिअरमधील बॉक्स ऑफिसवरचा इतिहास बदलणारा प्रकल्प बनला आहे. सलमान, आमिर आणि अन्य सुपरस्टार्सला मागे टाकत, अक्षयने इंडस्ट्रीवर आपली ताकद दाखवली आहे.
advertisement
दरम्यान,'जॉली एलएलबी 3' चित्रपटाची कथा दोन 'जॉली' वकिलांमधील न्यायालयीन लढाईभोवती फिरते, ज्यामुळे यात विनोद (Comedy), सस्पेन्स आणि भावनात्मक नाट्य यांचा दुहेरी डोस मिळतो. चित्रपटात अमृता राव, हुमा कुरेशी, गजराज राव आणि अन्नू कपूर यांसारखे अनेक दिग्गज कलाकार महत्त्वाच्या भूमिकेत आहेत.
मराठी बातम्या/मनोरंजन/
Akshay Kumar ने मोडला सलमान खानचा सर्वात मोठा रेकॉर्ड, 'या' बाबतीत बॉक्स ऑफिसवर बनला किंग
Next Article
advertisement
Superstar Fathers Flop Sons: सुपरस्टार वडिलांची महाफ्लॉप मुलं, सिनेमे आपटले; मेकर्सही झाले कंगाल
सुपरस्टार वडिलांची महाफ्लॉप मुलं, सिनेमे आपटले; मेकर्सही झाले कंगाल
    View All
    advertisement