Weather Alert: अरबी समुद्रात ‘शक्ती’, मराठवाड्यातील हवामानात मोठे बदल, IMD चं अपडेट

Last Updated:
Marathwada Rain: महाराष्ट्रातील हवामानात मोठे बदल जाणवत आहेत. मराठवाड्यातील रविवारचं अपडेट जाणून घेऊ.
1/5
अरबी समुद्रातील 'शक्ती' तीव्र चक्रीवादळामुळे राज्यातील हवामानात मोठे बदल जाणवत आहेत. विदर्भातील काही जिल्ह्यांत जोरदार पावसाची शक्यता असली, तरी कोकण, मध्य महाराष्ट्रासह बहुतांश भागात पावसाने उघडीप दिली आहे. मराठवाड्यातील रविवारी हवामानाची स्थिती काय राहील? जाणून घेऊ.

advertisement
2/5
शनिवारी छत्रपती संभाजीनगर आणि जालना वगळता मराठवाड्यातील सहा जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी करण्यात आला होता. त्यानुसार काही ठिकाणी विजांसह तुरळक हलका ते मध्यम पाऊस झाला. मात्र, आजपासून हवामानात मोठे बदल जाणवत आहेत.

3/5
मराठवाड्यातील कोणत्याही जिल्ह्याला आज, रविवारी मुसळधार पावसाचा इशारा नाही. मात्र, आठही जिल्ह्यांत विजांसह हलका ते मध्यम पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. छत्रपती संभाजीनगरसह आठही जिल्ह्यांत तुरळक हलक्या पावसाची शक्यता असल्याने नागरिकांना योग्य ती काळजी घ्यावी लागेल.

4/5
मराठवाड्यात आजपासून हवापालट होण्याची शक्यता आहे. पावसाचा जोर ओसरणार असून सोमवारपासून पाऊस पूर्णपणे उघडीप घेण्याचा अंदाज आहे. पुढील काही दिवस हवामानाची हीच स्थिती कायम राहण्याची शक्यता आहे.

5/5
दरम्यान, सप्टेंबरअखेर मराठवाड्यात पावसाने धुमाकूळ घातला होता. शेतीचे मोठे नुकासन झाले होते. अद्याप मराठाड्यातील शेतकरी या संकटातून सावरलेला नाही. मात्र, आता पावसाने उघडीप घेतल्याने शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळाला आहे.

Superstar Fathers Flop Sons: सुपरस्टार वडिलांची महाफ्लॉप मुलं, सिनेमे आपटले; मेकर्सही झाले कंगाल
सुपरस्टार वडिलांची महाफ्लॉप मुलं, सिनेमे आपटले; मेकर्सही झाले कंगाल
    View All
    advertisement