Kantara Chapter 1: ऋषभ शेट्टीची जादू! 'कांतारा 1' बॉक्स ऑफिसवर हिट, 3 दिवसांत केली इतक्या कोटींची कमाई

Last Updated:
Kantara Chapter 1: 'कांतारा चॅप्टर 1' या चित्रपटाने अवघ्या तीन दिवसांत बॉक्स ऑफिसवर इतिहास घडवला आहे. ऋषभ शेट्टीच्या या चित्रपटाने प्रेक्षकांना अक्षरशः थरारून टाकलं आहे. बॉक्स ऑफिसवर हा सिनेमा रेकॉर्डब्रेक कमाई करत आहे.
1/7
'कांतारा चॅप्टर 1' या चित्रपटाने अवघ्या तीन दिवसांत बॉक्स ऑफिसवर इतिहास घडवला आहे. ऋषभ शेट्टीच्या या चित्रपटाने प्रेक्षकांना अक्षरशः थरारून टाकलं आहे. बॉक्स ऑफिसवर हा सिनेमा रेकॉर्डब्रेक कमाई करत आहे.

advertisement
2/7
कांतारा चॅप्टर 1 हा कन्नड चित्रपट अभिनेता-दिग्दर्शक ऋषभ शेट्टीचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे. हा चित्रपट लोकांना कर्नाटकच्या किनारपट्टीवरील भूता कोला (Bhoota Kola) या पारंपरिक लोककथेचा आणि दैवी शक्तीचा उगम सांगतो.

3/7
कथेचा केंद्रबिंदू बर्मे नावाच्या एका उग्र योद्ध्याच्या संघर्षावर आधारित आहे, ज्याची भूमिका ऋषभ शेट्टीने साकारली आहे. बर्मे हा आपल्या आदिवासी समाजाच्या हक्कांसाठी आणि जमिनीसाठी एका अत्याचारी राजाविरुद्ध बंड करतो.

4/7
सिनेमात गुलिगा आणि पंजुर्ली या संरक्षक दैवतांची उत्पत्ती कशी झाली, त्यांचे महत्त्व काय आहे आणि ते जंगलाचे रक्षण कसे करतात, याची सविस्तर माहिती पौराणिक कथांच्या स्वरूपात दाखवण्यात आली आहे.

5/7
सॅकनिल्कच्या अहवालानुसार, चित्रपटाने तिसऱ्या दिवशी तब्बल 55 कोटींची कमाई केली असून, तीन दिवसांत एकूण कलेक्शन ₹162.85 कोटींच्या घरात पोहोचलं आहे.

6/7
या कमाईसह ‘कांतारा चॅप्टर 1’ वर्षातील सर्वाधिक कमाई करणारा कन्नड चित्रपट बनला आहे. त्याने ‘सु फ्रॉम सो’ (92 कोटी) आणि सलमान खानचा ‘सिकंदर’ (110 कोटी), राम चरणचा ‘गेम चेंजर’ (₹131 कोटी) या चित्रपटांनाही मागे टाकलं आहे.

7/7
या चित्रपटात ऋषभ शेट्टी पुन्हा एकदा मुख्य भूमिकेत आहे, तर त्याच्यासोबत रुक्मिणी वसंत, जयराम आणि गुलशन देवैया महत्त्वाच्या भूमिकांमध्ये झळकत आहेत. चित्रपट थिएटरमध्ये सध्या हाऊसफुल चालू असून, काही अहवालांनुसार या महिन्याच्या अखेरीस तो ओटीटीवर येण्याची शक्यता आहे.

Superstar Fathers Flop Sons: सुपरस्टार वडिलांची महाफ्लॉप मुलं, सिनेमे आपटले; मेकर्सही झाले कंगाल
सुपरस्टार वडिलांची महाफ्लॉप मुलं, सिनेमे आपटले; मेकर्सही झाले कंगाल
    View All
    advertisement