Weather Alert: विदर्भात पाऊस, पश्चिम महाराष्ट्रात वेगळीच स्थिती, पुणे ते कोल्हापूर आजचं हवामान अपडेट
- Reported by:Priti Nikam
- Published by:Shankar Pawar
Last Updated:
Weather alert: राज्यातील हवामानात सातत्याने बदल होत आहेत. आता ऑक्टोबर महिन्याच्या सुरुवातीलाच पश्चिम महाराष्ट्रात पावसाने उघडीप घेतल्याचे चित्र आहे.
अरबी समुद्रातील 'शक्ती'तीव्र चक्रीवादळ पश्चिमेकडे सरकत आहे. तर ओडिशातील ठळक कमी दाबाचे क्षेत्र बिहारकडे जाण्याची शक्यता आहे. ओडिशातील कमी दाब क्षेत्रामुळे पोषक हवामान झाल्याने आज 5 ऑक्टोबर रोजी विदर्भ, मराठवाड्यामध्ये विजांसह पावसाची शक्यता असून हवामान विभागाने सतर्कतेचा इशारा दिला आहे. पश्चिम महाराष्ट्रातील हवामानात मात्र मोठे बदल जाणवत आहेत. पुढील 24 तासांचा हवामान अंदाज जाणून घेऊ.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
पश्चिम महाराष्ट्रातील पाचही जिल्ह्यांत हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे. काही ठिकाणी ढगाळ आकाशासह हलक्या पावसाची नोंद होईल. मुख्यतः तापमानात काही अंशी वाढ होण्याची शक्‍यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे. पावसाची उघडीप शेतीच्या कामांना आणि वाचलेल्या पिकांच्या काढणीला उपयोगी ठरत आहेत.










