Pimpri Traffic Update : पिंपरीकरांसाठी मोठी बातमी! कोजागिरी पौर्णिमा उत्सवानिमित्त उद्या वाहतूक वळवली; 'हा' महत्त्वाचा मार्ग राहणार पूर्णपणे बंद
Last Updated:
Pimpri Traffic Changes For Kojagiri Pournima : कोजागिरी पौर्णिमेनिमित्त उद्या पिंपळे गुरव परिसरात वाहतुकीत तात्पुरते बदल करण्यात आले आहेत. जाणून घ्या कोणत्या पर्यायी मार्गाचा वापर वाहनचालकांनी करावा.
पिंपरी : कोजागिरी पौर्णिमेनिमित्त तुळजाभवानी मंदिर, पिंपळे गुरव येथे सोमवारी (दि. 6) दुर्गादेवी विसर्जन मिरवणुका पार पडणार आहेत. या निमित्ताने परिसरात मोठ्या प्रमाणावर गर्दी होण्याची शक्यता आहे. यामुळे सांगवी वाहतूक विभागाने तात्पुरते वाहतूक बदल जाहीर केले आहेत जे नागरिकांनी लक्षात घ्यावे.
पोलीस उपायुक्त विवेक पाटील यांनी सांगितल्याप्रमाणे मिरवणुकीच्या दिवसाच्या संध्याकाळी 4 वाजल्यापासून रात्री 10 वाजेपर्यंत काही मार्गांवर वाहनांना प्रवेशबंदी राहणार आहे. विशेषतहा बँक ऑफ महाराष्ट्र पिंपळे गुरव चौकातून तुळजाभवानी मंदिराकडे जाणारा मार्ग सर्व वाहनांसाठी बंद राहणार आहे.
वाहतूक नियंत्रकांनी नागरिकांसाठी पर्यायी मार्गही निश्चित केले आहेत. बँक ऑफ महाराष्ट्र चौकातून उजवीकडे वळून काशी विश्वेश्वर चौकमार्गे जाऊन वाहन चालक आपले प्रवास करू शकतात. तसेच सृष्टी चौकातून तुळजाभवानी मंदिर समोरून भैरवनाथ कमानीकडे जाणारा मार्ग बंद राहील. त्याऐवजी सृष्टी चौकातून सरळ 60 फुटी रोडने रामकृष्ण मंगल कार्यालय चौकमार्गे प्रवास करता येईल.
advertisement
सांगवी वाहतूक विभागाने नागरिकांना विनंती केली आहे की, मिरवणुकीच्या काळात पर्यायी मार्गांचा वापर करून पोलिसांचे सहकार्य करावे. मार्गदर्शनासाठी आणि सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी सांगवी पोलिस वाहतूक शाखेने बॅरिकेटिंग आणि मार्गदर्शन फलक लावले आहेत.
वाहतूक व्यवस्थेसाठी प्रशासनाने तयारी पूर्ण केली असून नागरिकांनी सक्तीच्या गरजेविना मंदिर परिसरात वाहन घेऊन जाणे टाळावे. तसेच मिरवणुकीत सहभागी होण्यासाठी येणारे लोकांनीही सुरक्षिततेचे नियम पाळावे.
advertisement
या बदलामुळे परिसरातील वाहतूक सुरळीत राहील आणि गर्दी नियंत्रणाखाली राहील असे पोलिसांनी सांगितले आहे. नागरिकांनी वेळेवर माहिती घेऊन नियोजन करणे गरजेचे आहे. ज्यामुळे प्रवास सुलभ होईल आणि गर्दीच्या काळात कोणतीही अडचण निर्माण होणार नाही.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
October 05, 2025 11:02 AM IST
मराठी बातम्या/पुणे/
Pimpri Traffic Update : पिंपरीकरांसाठी मोठी बातमी! कोजागिरी पौर्णिमा उत्सवानिमित्त उद्या वाहतूक वळवली; 'हा' महत्त्वाचा मार्ग राहणार पूर्णपणे बंद