पुण्यात रेकॉर्डवरील गुन्हेगाराचा मित्राकडूनच खून, प्यासा हॉटेलसमोर मध्यरात्री थरार, गुन्हेगार पसार

Last Updated:

Pune News: पुण्यात मित्रानेच मित्राचा खून केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. वाघोली पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

वाघोली खून
वाघोली खून
अभिजीत पोते, प्रतिनिधी, पुणे : पुण्यात वाघोली परिसरात मध्यरात्री एक धक्कादायक घटना घडली आहे. रेकॉर्डवरील गुन्हेगार बादल शेख याचा खून त्याच्याच मित्राने केला. मिळालेल्या माहितीनुसार, वाघोली परिसरातील प्यासा हॉटेलसमोर या तरुणाने आपल्या मित्रावर अचानक चाकूने वार केला. हल्ल्यात बादल शेख गंभीर जखमी झाला आणि त्याच्या घटनास्थळीच मृत्यू झाला.
पुण्यात टोळीयुद्ध भडकलेले असताना आणि ठराविक काळानंतर कोयता गँगचा नंगा नाच होत असताना पुण्याच्या उपनगरांतही गुन्हेगारी टोळकी सक्रीयपणे काम करीत आहेत. त्यामुळे पोलिसांसमोर नवे आव्हान उभे ठाकले आहे.

मृत व्यक्ती आणि आरोपी दोघेही रेकॉर्डवरील गुन्हेगार, पोलीस आरोपीच्या शोधात

मृत व्यक्ती आणि आरोपी दोघेही रेकॉर्डवरील गुन्हेगार आहेत. वाघोली पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी हल्ल्यानंतर पसार झाला आहे. सध्या वाघोली पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत.
advertisement
वाघोली परिसरातील लोक खुनाच्या घटनेने हादरले आहेत. पोलिसांनी आरोपीच्या शोधासाठी पथके नियुक्त केली असून पुरावे गोळा करण्यास सुरुवात केली आहे. शहरातील विविध मार्गांवर चौकशी सुरू आहे.
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
पुण्यात रेकॉर्डवरील गुन्हेगाराचा मित्राकडूनच खून, प्यासा हॉटेलसमोर मध्यरात्री थरार, गुन्हेगार पसार
Next Article
advertisement
Superstar Fathers Flop Sons: सुपरस्टार वडिलांची महाफ्लॉप मुलं, सिनेमे आपटले; मेकर्सही झाले कंगाल
सुपरस्टार वडिलांची महाफ्लॉप मुलं, सिनेमे आपटले; मेकर्सही झाले कंगाल
    View All
    advertisement