शेतकऱ्यांपासून ते कामगारांपर्यंत! महिन्याला मिळणार ३,००० रु, योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज कुठे अन् कसा करायचा?

Last Updated:

PMSYM Yojana : देशातील असंघटित क्षेत्रातील लाखो कामगारांसाठी केंद्र सरकारने आणलेली प्रधानमंत्री श्रम योगी मानधन योजना (PM-SYM) ही अत्यंत उपयुक्त आणि दिलासादायक ठरत आहे.

Agriculture news
Agriculture news
मुंबई : देशातील असंघटित क्षेत्रातील लाखो कामगारांसाठी केंद्र सरकारने आणलेली प्रधानमंत्री श्रम योगी मानधन योजना (PM-SYM) ही अत्यंत उपयुक्त आणि दिलासादायक ठरत आहे. या योजनेअंतर्गत पात्र कामगारांना वयाच्या ६० व्या वर्षानंतर दरमहा ३ हजार रुपयांची निश्चित पेन्शन मिळणार आहे. वयस्कर अवस्थेत आर्थिक आधार मिळावा आणि असंघटित क्षेत्रातील कामगारांना सुरक्षित भविष्य मिळावे, हा या योजनेचा प्रमुख उद्देश आहे.
ही योजना विशेषतः लहान शेतकरी, हातगाडी चालक, रिक्षाचालक, रोजंदारीवर काम करणारे मजूर, बांधकाम कामगार आणि घरगुती कामगारांसाठी सुरू करण्यात आली आहे. देशातील मोठा वर्ग असंघटित क्षेत्रात काम करणारा असल्याने, या योजनेतून लाखो लोकांना थेट लाभ होणार आहे.
योजनेची प्रमुख वैशिष्ट्ये
पेन्शन रक्कम: पात्र कामगारांना वयाच्या ६० वर्षांनंतर दरमहा ३,००० रु निश्चित पेन्शन मिळते.
advertisement
योगदान रक्कम: अर्जदाराच्या वयानुसार दरमहा ५५ ते २०० रु पर्यंत योगदान करावं लागतं. उर्वरित रक्कम सरकार स्वतः जमा करते.
कुटुंब पेन्शन: सदस्याच्या मृत्यूनंतर, पती किंवा पत्नीला पेन्शनच्या ५० टक्के रक्कम कुटुंब पेन्शन म्हणून मिळते.
लवचिकता: सहभागी कामगाराला हवे असल्यास योजनेतून स्वेच्छेने बाहेर पडण्याचा पर्याय उपलब्ध आहे.
प्रशासन: ही योजना भारतीय आयुर्विमा महामंडळ (LIC) द्वारे चालवली आणि व्यवस्थापित केली जाते.
advertisement
कोण लाभ घेऊ शकतो?
वय मर्यादा: अर्जदाराचे वय १८ ते ४० वर्षांदरम्यान असावे.
उत्पन्न मर्यादा: मासिक उत्पन्न १५,००० रु किंवा त्यापेक्षा कमी असावे.
रोजगार क्षेत्र: रस्त्यावरील विक्रेते, कचरा गोळा करणारे, बांधकाम मजूर, घरकामगार, शेतमजूर, बीडी कामगार, मच्छीमार, चामडे कामगार, विणकर आदी असंघटित क्षेत्रातील कामगार पात्र आहेत.
इतर अटी काय?
EPF, ESIC किंवा NPS यांसारख्या योजनांमध्ये समाविष्ट नसावा.
advertisement
आयकर भरणारा नसावा. इतर कोणत्याही सरकारी पेन्शन योजनेचा लाभ घेतलेला नसावा.
आवश्यक कागदपत्रे
आधार कार्ड
मोबाईल नंबर (आधारशी लिंक केलेला असावा)
बचत बँक खाते किंवा जन धन खाते (IFSC कोडसह)
नोंदणी प्रक्रिया
जवळच्या कॉमन सर्व्हिस सेंटर (CSC) वर आपल्या आधार आणि बँक खात्याच्या तपशीलांसह जा.तेथे बायोमेट्रिक प्रमाणीकरण (Biometric Authentication) करून घ्यावे.CSC ऑपरेटर तुमच्यासाठी ऑनलाइन नोंदणी फॉर्म भरतो.पहिल्या महिन्याचे योगदान रोख स्वरूपात जमा करावे लागते.त्यानंतर तुमच्या बँक खात्यातून ऑटो-डेबिट सुविधा सक्रिय केली जाते.
advertisement
प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला PM-SYM कार्ड देण्यात येते.
मराठी बातम्या/कृषी/
शेतकऱ्यांपासून ते कामगारांपर्यंत! महिन्याला मिळणार ३,००० रु, योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज कुठे अन् कसा करायचा?
Next Article
advertisement
Superstar Fathers Flop Sons: सुपरस्टार वडिलांची महाफ्लॉप मुलं, सिनेमे आपटले; मेकर्सही झाले कंगाल
सुपरस्टार वडिलांची महाफ्लॉप मुलं, सिनेमे आपटले; मेकर्सही झाले कंगाल
    View All
    advertisement